Shivraj Motegaonkar : NEET पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरांना सीबीआयकडून अटक; तब्बल 11 तास कसून चौकशी
Shivraj Motegaonkar : ‘सीबीआय’ने आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे

Shivraj Motegaonkar : पेपरफुटीच्या आरोपांमुळे नीट-युजी 2026 परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र या प्रकारामुळ देशभरातून संता व्यक्त करत ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे.
लातूर येथील प्रसिद्ध रेणुकाई करिअर सेंटर’चे (RCC) संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. रात्रभर सीबीआय कार्यालयात मोटेगावकरांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी त्यांची तब्बल ११ तास चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
विद्यार्थ्यांचीही सीबीआयकडून चौकशी (Shivraj Motegaonkar)
मोटेगावकर क्लालेसच्या विद्यार्थ्यांचीही आता सीबीआयकडून चौकशी सुरु करण्यात येत आहे. गेल्या काही तासांपासून काही पालक त्यांच्या पाल्यांसोबत सीबीआय कार्यालयात आले आहेत. मोटेगावकर क्लासेस मधून असंख्य विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.
Pune Fuel Protest : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शरद पवारांच्या पक्षाकडून बैलगाडी व टांगा मोर्चा…
अनेक विद्यार्थी या क्लासमुळे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र आता या पेपर फुटी प्रकरणात खुद्द संचालकांनाच ताब्यात घेतल्याने शिक्षण वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. Shivraj Motegaonkar
तपासात असे समोर आले आहे की, २३ एप्रिल २०२६ रोजी म्हणजेच परीक्षेच्या आधीच त्यांनी नीट युजी परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरे मिळवली होती. १४ मे रोजी लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या झडतीत, त्यांच्या मोबाईलमध्ये या परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आढळून आले होते.
प्रश्नपत्रिका नष्ट केल्याचेही निष्पन्न (Shivraj Motegaonkar)
शिवराज मोटेगावकर यांनी ही प्रश्नपत्रिका अनेक व्यक्तींना आणि विद्यार्थ्यांना पुरवल्याचा संशय आहे. परीक्षा झाल्यानंतर त्यांनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रश्नपत्रिका नष्ट केल्याचेही निष्पन्न झाले आहे. तसेच, ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांना पेपर दिले त्यांची नावे सांगण्यासही त्यांनी टाळाटाळ केली.
आतापर्यंत 9 आरोपींना अटक (Shivraj Motegaonkar)
दरम्यान, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून अटक केली हाेती. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा अध्यापक असून, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होता. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ब्यूटी पार्लर चालविणारी मनीषा वाघमारे हिला देखील यापूर्वी अटक केली होती. ‘सीबीआय’ने जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर परिसरातून आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे.
त्यातील पाच आरोपींना 7 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार, याचा अधिक तपास सीबीआयकडून केला जात आहे. Shivraj Motegaonkar
हेही वाचा :





