Pune Fuel Protest : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शरद पवारांच्या पक्षाकडून बैलगाडी व टांगा मोर्चा…
Pune Fuel Protest : दरवाढ मागे घेण्यात आली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

Pune Fuel Protest : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर शाखेच्या वतीने सोमवारी पुणे महापालिकेवर बैलगाडी व टांगा मोर्चा काढण्यात आला. शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण वाढला असून, वाहतूक खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीदेखील वाढत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारच्या धोरणांमुळे महागाई वाढत असून, सामान्य नागरिक त्रस्त झाल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
तसेच ही दरवाढ तातडीने मागे घेण्यात आली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. Pune Fuel Protest
मोर्चामध्ये गटनेते काकासाहेब चव्हाण, महिला अध्यक्षा स्वातीताई पोकळे, गफुरभाई पठाण, अनिताताई इंगळे, रविंद्रअण्णा माळवदकर, दीपक जगताप, अजिंक्य पालकर, अमोघ ढमाले, हर्षद जाधव, प्रवीण तुपे, मकरंद देशमुख, वंदना मोडक, दिलशाद अत्तार, उर्मिला गुंड, जयश्री आदमाने, मेघा सातव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. Pune Fuel Protest
हेही वाचा :





