Amitabh Jhunjhunwala : RCom बँक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; रिलायन्स समूहाचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुनझुनवाला CBI च्या ताब्यात
Amitabh Jhunjhunwala : तसेच 17 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कंपनीकडे जवळपास 19,694 कोटी रुपये थकित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Amitabh Jhunjhunwala : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत रिलायन्स समूहाचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुनझुनवाला (Amitabh Jhunjhunwala) यांना अटक केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाची तब्बल 6,000 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
CBI च्या माहितीनुसार, कथित गैरव्यवहाराच्या काळात झुनझुनवाला हे रिलायन्स कम्युनिकेशन समूहाचे ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर होते. कॉर्पोरेट फायनान्स, बँकिंग आणि फंड मॅनेजमेंट यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. बँकांकडून कर्ज मिळवण्यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्ज प्रक्रियाही पार पडल्याचा आरोप आहे. (Amitabh Jhunjhunwala)
तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार, बँकांकडून मिळालेल्या कर्जाचा वापर नियोजित उद्देशांऐवजी इतर कारणांसाठी करण्यात आला. या कथित गैरवापरामुळे बँकांना हजारो कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. विविध बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज उभारण्यात झुनझुनवाला यांची महत्त्वाची भूमिका होती, असे CBI ने म्हटले आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्सने कर्जाची परतफेड न केल्याने संबंधित खाती एनपीए (NPA) झाली. या संपूर्ण प्रक्रियेत झुनझुनवाला हे कंपनीचे प्रवर्तक आणि वरिष्ठ नेतृत्वाकडून निर्देश घेत असल्याचा आरोपही तपास यंत्रणेने केला आहे. यापूर्वी SBI च्या तक्रारीवरून रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अनिल अंबानी यांच्याविरोधात CBI ने गुन्हा दाखल केला होता. या व्यवहारांमुळे SBI ला सुमारे 2,929 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. (Amitabh Jhunjhunwala)
हेही वाचा : Trisha Krishnan: तृषा कृष्णनसाठी मे महिना ठरला खास; अभिनेत्रीने शेअर केल्या सुंदर आठवणी
SBI च्या नेतृत्वाखालील 11 बँकांच्या कन्सोर्टियमने रिलायन्स कम्युनिकेशन्सला कर्ज मंजूर केले होते. या सर्व बँकांना मिळून जवळपास 6,015 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच 17 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कंपनीकडे जवळपास 19,694 कोटी रुपये थकित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Amitabh Jhunjhunwala : RCom बँक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; रिलायन्स समूहाचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुनझुनवाला CBI च्या ताब्यात
CBI ने विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि LIC यांच्या तक्रारींवरून रिलायन्स कम्युनिकेशन्स, RHFL, RCFL आणि RTL विरोधात आणखी सहा गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू असून ती सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होत आहे.
दरम्यान, अमिताभ झुनझुनवाला हे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) एका वेगळ्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून दिल्लीतील तिहार कारागृहात होते. सध्याच्या प्रकरणात त्यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबईतील विशेष न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट मिळवण्यात आले. त्यानंतर त्यांना मुंबईत आणून 1 जून रोजी न्यायालयात हजर करण्यात आले.
CBI ने न्यायालयात त्यांना औपचारिक अटक केल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून सध्या त्यांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पोलीस कोठडीबाबतची सुनावणी लवकरच होणार आहे.
विशेष म्हणजे, 29 मे 2026 रोजी CBI ने या प्रकरणात पहिले आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्स, कंपनीचे पाच वरिष्ठ अधिकारी आणि 10 बँक अधिकाऱ्यांसह एकूण 16 आरोपींचा समावेश आहे.
10 ते 15 ठिकाणी छापेमारी (Amitabh Jhunjhunwala)
दरम्यान, ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने मार्च 2026 मध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (RCOM) आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या आवारात मोठी छापेमारी केली. ईडीच्या 15 पथकांनी एकाच वेळी मुंबईतील 10 ते 12 ठिकाणी छापे टाकले होते.





