NEET Paper Leak Case : ‘GOD’ नंबरचे गूढ उलगडलं! पुण्यात मोठी कारवाई; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
NEET Paper Leak Case : तपासात तेजस शाहने मनिषा हवालदारकडून प्रश्नपत्रिका घेतल्याचे उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणातील ही आतापर्यंतची तेरावी अटक आहे.

NEET Paper Leak Case : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होताना दिसत आहे. पुण्यातील प्राध्यापिका मनिषा हवालदार हिला अटक केल्यानंतर आता सीबीआयने या प्रकरणात आणखी एकाला अटक केली आहे.
सीबीआयकडून राज्यभरात विविध ठिकाणी धाडसत्र सुरू असून तपासादरम्यान मनिषा हवालदार हिच्या मोबाईलमध्ये “GOD” नावाने सेव्ह केलेला एक नंबर आढळून आला होता. या नंबरचा तपास केल्यानंतर तो तेजस शाह नावाच्या विद्यार्थ्याचा असल्याचे समोर आले. त्यानंतर सीबीआयने पुण्यातून तेजस शाहला अटक केली आहे. (NEET Paper Leak Case)
तपासात तेजस शाहने मनिषा हवालदारकडून प्रश्नपत्रिका घेतल्याचे उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणातील ही आतापर्यंतची तेरावी अटक आहे.
याआधी लातूरमधील डॉ. मनोज शिरुरे यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती. रसायनशास्त्र विषयाचे लीक झालेले प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
तेजस शाह हा विद्यार्थी असून या संपूर्ण पेपरफुटी रॅकेटमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता असून सीबीआय त्याची कसून चौकशी करत आहे.
दरम्यान, सीबीआयने देशभरातील 49 ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईदरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर या ठिकाणी कारवाई केली असून आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
मोठे खुलासे होण्याची शक्यता (NEET Paper Leak Case)
मनिषा हवालदार आणि तेजस शाह यांच्यात नेमके कोणते संबंध होते? तेजस शाह कोणाच्या संपर्कात होता? या संपूर्ण नेटवर्कमागे आणखी कोण आहेत? याचा सखोल तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे. तेजस शाहच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्यामार्फत आणखी किती विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचली, याचा तपास सीबीआय करत आहे.
NTA शी संबंधित तज्ज्ञांचाही तपास सुरू (NEET Paper Leak Case)
या प्रकरणात लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरे यांनाही अटक करण्यात आली आहे. रसायनशास्त्र विषयाचे लीक झालेले प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच पुण्यातील काही शिक्षक आणि NTA शी संबंधित तज्ज्ञांचाही तपास सुरू आहे. आणखी एक महिला प्राध्यापिका सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे.






