Cannes Film Festival: अस्सलं मराठी माणूस! कान्सच्या रेड कार्पेटवर निवेदिता आणि अशोक सराफ यांनी जपली मराठी संस्कृती
Cannes Film Festival : प्राजक्ता माळी आणि अंकिता वालावलकरणे देखील पारंपरिक मराठी पेहरावात फ्रान्समध्ये मराठी संस्कृतीची झलक दाखवली

Cannes Film Festival : यंदाही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. रेड कार्पेटवरील हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेकांचा लुक चर्चेत राहिला. विशेष म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेसृष्टीच्या मान उंचवणारा क्षण पाहायला मिळाला.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी कलाविश्वितील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी हजेरी लावली. रेड कार्पेटवर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी मराठी संस्कृती जपत पारंपरिक लूक केल्याचं दिसलं. अशोक-निवेदिता सराफ यांनी मराठमोळा लूक करत कान्समध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.मात्र अशोक सराफ यांच्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकून घेतली.
मराठमोळा लूक
कान्ससाठी अशोक सराफ-निवेदिता सराफ यांनी मराठमोळा लूक केला होता. पांढऱ्या रंगाचा सूट आणि काळ्या रंगाची पँट असा लूक अशोक सराफ यांनी केला होता. तर निवेदिता सराफ महाराष्ट्राचं महावस्त्र असलेल्या पैठणी साडीत दिसल्या. Cannes Film Festival
त्यासोबतच केसांत गजरा माळून दागिन्यांचा साज करत कान्सच्या रेड कार्पेटवर त्यांनी एन्ट्री केली. या जोडीला पाहताच क्षणी सगळेच आश्चर्यचकित झाले. रेड कार्पेटवर येताच अशोकमामांनी हात जोडत सगळ्यांना नमस्कार केला. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासह प्राजक्ता माळी आणि अंकिता वालावलकर हिनंही पारंपरिक मराठी पेहरावात फ्रान्समध्ये मराठी संस्कृतीची झलक दाखवत चाहत्यांची मनं जिंकली. काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेता पुष्कर जोग यानं कान्समधील त्याचा स्टायलिश लूक आणि उपस्थितीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (Cannes Film Festival)
हेही वाचा:






