Maharashtra Politics : मोठी बातमी..! बंडखोर चार खासदार मुंबईत दाखल; ओमराजे दिल्लीकडे रवाना; चर्चांना उधाण
Maharashtra Politics : आज ६ बंडखोर खासदारांपैकी ४ खासदार दिल्लीहून विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत.

Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील बंडखोर खासदारांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सहा फुटीर खासदारांपैकी चार खासदार दिल्लीहून मुंबईत दाखल झाले असून, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर मात्र मुंबईऐवजी दिल्लीकडे रवाना झाल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
मुंबईत दाखल झाले हे खासदार
दिल्लीहून मुंबईत आलेल्या खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे तर खासदार संजय दिना पाटील हे आधीपासून मुंबईत असून तेही शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी पोहोचल्याचे समजते. (Maharashtra Politics)
ओमराजे दिल्लीला रवाना
ओमराजे निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण सोलापूरहून दिल्लीला रवाना होत असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “मी आता दिल्लीला जात आहे. त्यानंतर मुंबईला येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्ही काम करू. आता बोलण्यापेक्षा कृतीवर भर असेल.” (Maharashtra Politics)
सूत्रांच्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आवश्यक संसदीय प्रक्रिया पूर्ण करू शकतात. त्यानंतर ते थेट मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)

From left to right: Sanjay Jadhav, Sanjay Deshmukh, Nagesh Patil Ashtikar, Bhausaheb Wakchaure, Sanjay Dina Patil, and Omraje Nimbalkar.
विकासासाठी सत्तेत जाण्याचा दावा
रविवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ओमराजे निंबाळकर यांनी विकासकामांसाठी आणि निधी मिळवण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे नागेश पाटील आष्टीकर यांनीही मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. (Maharashtra Politics)
आज होणार औपचारिक प्रवेश?
ओमराजे दिल्लीतील प्रक्रिया पूर्ण करून मुंबईत पोहोचल्यानंतर सहा बंडखोर खासदारांचा एकत्रितपणे शिंदे यांच्या शिवसेनेत औपचारिक प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना आज निर्णायक वळण मिळण्याची चिन्हे आहेत. (Maharashtra Politics)





