Pune Visapur Landslide: “५ मिनिटात होत्याचं नव्हतं झालं…अख्ख कुटुंब ढिगाखाली गेलं…” ; विसापुरमध्ये निसर्गाचं रौद्ररूप, पहा अंगावर काटा आणणारे फोटो
Pune Visapur Landslide: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे.
Updated On:

Pune Visapur Landslide: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे.
विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाठण गावात डोंगराचा भाग कोसळून मोठी दरड घरावर आली.
या दुर्घटनेत एक घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून, कुटुंबातील तिघे जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर मदत व शोधकार्य सुरू आहे.

लोणावळा परिसरात विक्रमी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.











