पवनानगर, (प्रतिनिधी) – बऊर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शंकर शिंदे तर उपसरपंचपदी साधना भवार यांची बिनविरोध निवड विशेष सभेत करण्यात आली आहे. मावळते सरपंच प्रवीण भवार व उपसरपंच सावित्रीबाई दाभाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
रिक्त झालेल्या जागेवर सरपंचपदासाठी शंकर शिंदे तर उपसरeपंचपदासाठी साधना भवार यांचा एक-एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी एस. एस. चोरमले, तलाठी दीपक धनावडे व ग्रामसेवक अमोल कोळी यांनी शिंदे व भवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आहे.
या वेळी सदस्य संदीप खिरीड, प्रवीण भवार, संदीप दळवी, सावित्री दाभाडे, मंगल मगर, प्रमिला वायभट यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थितीत होते.