Ranji Trophy Cricket : महाराष्ट्राचा आजपासून सेनादलाशी सामना…

Ranji Trophy 2024 : – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा सामना आजपासून येथे सेनादल संघाशी (Services vs Maharashtra) होत आहे. मुळातच आव्हान संपलेल्या महाराष्ट्रासाठी हीच नव्हे तर यापुढील प्रत्येक लढत केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी जिंकावीच लागणार आहे.
यंदाच्या मोसमात महाराष्ट्राचा संघ एलिट अ गटात सहाव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत या स्पर्धेत सहा सामने खेळताना केवळ एकच सामना जिंकला होता. त्यानंतर त्यांना तीन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. एक सामना अनिर्णित राहिला होता. महाराष्ट्राचे केवळ ११ गुण असून त्यांचे यंदाच्या मोसमाच्या स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे.
संघात आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधवसह अनेक नामवंत खेळाडू असतानाही महाराष्ट्रावर ही परिस्थिती ओढावली आहे. महाराष्ट्राचा हा एलिट गट क्रमांक अ मधील हा अखेरचा साखळी सामना आहे. या फेरीचे सर्व संघांचे अखेरचे सामने आजपासून (गुरुवार) सुरु होत आहेत.
IND vs ENG 3rd Test : रोहित शर्मानं इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून रचली विक्रमांची मालिका….
त्यानंतर एलिट गटाचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरु होणार आहेत. २ ते ६ मार्च या कालावधीत दोन्ही उपांत्य फेरीचे सामने होतील. स्पर्धेचा अंतिम सामना १० ते १४ मार्च या कालावधीत होणार असून उपांत्यपूर्व, उपांत्य तसेच अंतिम सामन्याचे ठीकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.





