Ranji Trophy 2024-25 : सुरज, शुभम अन् रवीची अर्धशतके; सेनादलाची महाराष्ट्राविरुद्ध दमदार सुरुवात…

पुणे – सेनादलाच्या सुरज वसिष्ठ, शुभम रोहिला व रवी चौहान यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर सेनादल संघाने रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्राविरुद्ध पहिल्याच दिवशी ४ बाद २३९ धावांपर्यंत मजल मारली.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु असलेल्या लढतीमध्ये पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून सेनादलाने फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर सुरज वसिष्ठ व शुभम रोहिला यांनी १२८ धावांची सलामी दिली. अखेर तरणजीतसिंगने शुभम रोहिलाचा बचाव भेदण्यात यश मिळविले. शुभमने १३२ चेंडूत ९ चौकारांच्या साहाय्याने ६७ धावांची खेळी केली. त्यानंतर नितीन तन्वर मात्र ५ धावा काढून परतला.
Stumps Day 1: Services – 239/4 in 89.6 overs (Varun Choudhary 1 off 14, Rajat Paliwal 21 off 60) #MAHvSER #RanjiTrophy #Elite
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 6, 2024
६४ व्या षटकांत सत्यजित बच्छावने सुरज वशिष्ठला ७९ धावांवर बाद केले. त्यानंतर रवी चौहानने किल्ला लढविताना ५९ धावांची खेळी केली. दिवसअखेर रजत पालीवाल २१ तर वरुण चौधरी १ धावा करून नाबाद राहिले. महारष्ट्राकडून तरणजीतसिंग, सत्यजित बच्छाव, हितेश वाळुंज व मुकेश चौधरीने प्रत्येकी १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : सेनादल : पहिला डाव : पहिल्या दिवस अखेर : ९० षटकांत ४ बाद २३९ : सुरज वशिष्ठ ७९, शुभम रोहिला ६७, रवी चौहान ५९, रजत पालीवाल नाबाद २१, वरुण चौधरी नाबाद १, मुकेश चौधरी१-३४, सत्यजित बच्छाव १-४३, तरणजीतसिंग १-६०, हितेश वाळुंज १-८१.





