Rohit sharma scored a century against England and created series of records : आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आणि विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारतीय संघाने जिंकली. आता तिसरी कसोटी जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरली आहे. हा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे.
राजकोट येथील तिसऱ्या कसोटीत कर्णधार रोहित शर्मानं ( Rohit Sharma ) नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात 5 गडी गमावून 326 धावा केल्या आहेत. सध्या रवींद जडेजा ( Ravindra Jadeja ) 110 धावांवर नाबाद असून कुलदीप यादव एका धावेवर नाबाद आहे. इंग्लंडकडून आतापर्यंत मार्क वुडने तीन, तर टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली.
रोहित शर्माने 131 धावा करत बाद झाला. त्याने 196 चेंडूंच्या खेळीत 14 चौकार आणि तीन षटकार मारले. यादरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्याच्या कारकिर्दीतील हे 11वे शतक आहे. राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात त्याने 157 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्माने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार मारले. या खेळीत रोहितने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रोहितचा हा 57 कसोटी सामना आहे.
रोहितचे आजच्या खेळीतले विक्रम…
1. भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. रोहितच्या नावावर आता 18642 धावा आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा….
सचिन तेंडूलकर – 34357
विराट कोहली- 26733
राहुल द्रविड – 24208
रोहित शर्मा – 18642
सौरव गांगुली – 18575
2. वीरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याच्या नावावर 90 षटकार आहेत. रोहित शर्मा 80 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या डावात त्याने तीन षटकार मारले आहेत, ज्यामुळे तो एमएस धोनीच्या पुढे गेला आहे. ज्यांच्या नावावर 78 षटकार आहेत.
भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार
वीरेंद्र सहवाग : 90
रोहित शर्मा : 80
एमएस धोनी : 78
सचिन तेंडुलकर : 69
रविंद्र जडेजा : 61*
कपिल देव : 61
3. आता रोहितच्या नावावर कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 593 षटकार आहेत आणि 600 आंतरराष्ट्रीय षटकारांचा विक्रम गाठण्यापासून तो फक्त सात षटकार कमी आहे.
कसोटी : 80
वनडे : 323
टी20 : 190
4. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोहित शर्माचे हे 47 वे शतक होते आणि सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे आणि जो रूटला मागे सोडले आहे.
विराट कोहली- 80
डेविड वॉर्नर- 49
रोहित शर्मा- 47*
जो रूट- 46
5. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात वयाच्या 36 वर्षे आणि 292 दिवसांत कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील 11वे शतक झळकावले. यासह, तो भारतासाठी शतक झळकावणाऱ्या सर्वात वयोवृद्ध कर्णधारांच्या यादीत पहिला ठरला आणि त्याने विजय हजारे यांना मागे टाकले.
शतक झळकावणारे सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार
36 वर्षे 291 दिवस – रोहित शर्मा वि. इंग्लंड
36 वर्षे 278 दिवस – विजय हजारे विरुद्ध इंग्लंड
36 वर्षे 236 दिवस – विजय हजारे विरुद्ध इंग्लंड
36 वर्षे 73 दिवस – रोहित शर्मा वि. वेस्ट इंडिज
35 वर्षे 321 दिवस – मोहम्मद अझरुद्दीन विरुद्ध न्यूझीलंड
35 वर्षे 285 दिवस – रोहित शर्मा वि. ऑस्ट्रेलिया
35 वर्षे 38 दिवस – मोहम्मद अझरुद्दीन विरुद्ध ऑस्ट्रेलिया
6. सलामीवीर म्हणून रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 42 वे शतक झळकावले आणि ख्रिस गेलची बरोबरी केली.
या यादीत डेव्हिड वॉर्नर 49 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके (डाव).
49 – डेविड वार्नर (454 डाव)
45 – सचिन तेंदुलकर (342)
42 – रोहित शर्मा* (339)
42 – ख्रिस गेल (506)
41 – सनथ जयसूर्या (563)
40 – मैथ्यू हेडन (340)
7. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतासाठी सलामीवीर म्हणून सर्वाधिक कसोटी शतके
4 – सुनील गावस्कर
3- विजय मर्चेंट
3-मुरली विजय
3- केएल राहुल
3 – रोहित शर्मा*
8. भारताकडून इंग्लंडविरुद्ध चौथ्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी
249 धावा – सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली, हेडिंग्ले, 2002
222 धावा – विजय मांजरेकर आणि विजय हजारे, हेडिंग्ले, 1952
204 धावा – रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा, राजकोट, 2024
190 धावा – मोहम्मद अजहरुद्दीन आणि मोहिंदर अमरनाथ, चेन्नई, 1985
189 धावा – मोहम्मद अजहरुद्दीन आणि संजय मांजरेकर, ओल्ड ट्रैफर्ड, 1990
9. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या बाबतीत रोहित चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या नावावर 4,606 धावा आहेत. या प्रकरणात रोहितने सचिन तेंडुलकरला मागे टाकले.
विराट कोहली : 12,883 धावा
एमएस धोनी : 11,207 धावा
अझरुद्दीन : 8,095 धावा
रोहित शर्मा : 4,606 धावा
सचिन तेडूंलकर : 4,508 धावा
10. भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याच्या यादीत तो पहिल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार लगावण्याच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारणारे भारतीय कर्णधार
212*- रोहित शर्मा
211 – एमएस धोनी
138-विराट कोहली
132 – सौरव गांगुली
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार
233 – इयोन मॉर्गन
212*- रोहित शर्मा
211 – एमएस धोनी
171 – रिकी पोंटिंग
170 – ब्रेंडन मैकुलम