रणजी करंडक क्रिकेट : मुंबईची सामन्यावर पकड

बेंगळुरू – पहिल्या डावातील शतकवीर यशस्वी जयस्वाल याने दुसऱ्या डावात मात्र, पहिली धाव घेण्यासाठी तब्बल 53 चेंडू घेतले. अर्थात या संथ फलंदाजीनंतरही त्याने पॉथ्वी शॉ व अरमान जाफरसह केलेल्या खेळीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यावर तिसऱ्याच दिवशी मजबूत पकड घेतली आहे.
मुंबईने आपल्या पहिल्या डावात 393 दावा केल्यावर उत्तर प्रदेशला अवघ्या 180 धावांत गुंडाळले व 213 मोठी आघाडी घेतली. मुंबईकडून तुषार देशपांडे, मोहित अवस्थी व तनुष कोटियन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्यानंतर मुंबईने आपला दुसरा डाव सुरु केला. शॉ व जयस्वाल यांनी 66 धावांची सलामी दिली मात्र, जयस्वाल इतका संथ होता की यातील 64 धावा एकट्या शॉ यानेच फटकावल्या होत्या.
त्यानंतल शॉ बाद झाल्यावर जयस्वालने अरमान जाफरसह संघाचे शतक फलकावर लावले. खेळ थांबला तेव्हा मुंबईच्या दुसऱ्या डावात 1 बाद 133 धावा झाल्या आहेत. आता मुंबईकडे एकूण आघाडी 346 धावांची असून हा सामना जिंकत अंतिम फेरी गाठण्याची संधी आणखी भक्कम बनली आहे.
जैसवालच्या या संथ खेळीमुळे एक विक्रमही साकार झाला आहे. यापूर्वी 1888 साली ऑस्ट्रेलियन विरूद्ध नॉर्थ सामन्यात ऑल्ड ट्राफोर्डवर पी. एस. मॅकडोनल्ड यांनी 86 धावांच्या भागीदारीमधील 82 धावा केल्या होत्या. तर ए.सी. बॅनरमन यांनी अवघ्या 4 धावा केल्या होत्या.
मध्य प्रदेशला आघाडी
बंगालविरुद्धच्या उपांत्य लढतीत मध्य प्रदेशने महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेशने पहिल्या डावात 341 धावा केल्या होत्या. त्यांला चांगली लढत देत बंगालच्या शाहबाद अहमद व मनोज तिवारी यांनी शतके फटकावली होती. मात्र, अन्य फलंदाजांनी निराशा केलायाने त्यांचा पहिला डाव 272 धावांवर संपला व मध्य प्रदेशने 69 धावांची आघाडी घेतली. यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ तांबला तेव्हा मध्य प्रदेशने आपल्या दुसऱ्या डावात दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 2 गडी गमावून 163 धावा केल्या असून आता त्यांच्याकडे अकूण आघाडी 231 धावांची आहे. रजत पाटीदार 63 धावांवर खेळत असून आदीत्य श्रीवास्तव 34 धावांवर नाबाद आहे.





