हडपसर – साधना सहकारी बँकेच्या कार्यलक्षी संचालकपदी भाऊ ज्ञानोबा तुपे व अशोक पंढरीनाथ घुले यांची निवड करण्यात आली आहे. साधना बँकेचे अध्यक्ष सुरेश घुले यांनी तसे निवडीचे पत्र दिले आहे.
भाऊ तुपे व अशोक घुले हे गेल्या २२ वर्षांपासून बँकेत विविध पदांवर कार्यरत आहेत. बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिक ताकद देवून, बँकेच्या विविध योजना तळागाळात पोचविण्यासाठी काम करणार असल्याचे कार्यलक्षी संचालक भाऊ तुपे व अशोक घुले यांनी यावेळी सांगितले.
बँकेचे अध्यक्ष सुरेश घुले म्हणाले की, करोना महामारीमुळे जगभरातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जात असताना साधना बँकेने पगारवाढ करून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. २८ शाखा व १ विस्तारित कक्षात सर्व कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळातही सभासद व ग्राहकांना अखंड सेवा दिली. तसेच बँक कर्मचारी व त्यांच्या कुटूंबासाठी मेडिक्लेम पॉलिसी सन २००४ पासून राबवित असून कर्मचाऱ्यांसाठी लाईफ इन्शुरन्स ही बँकेने स्वखर्चाने दिला आहे. कर्मचारी संस्थेचा कणा आहे. कोणतीही संस्था कर्मचारीच्या बळावर मोठी होत असते. यावेळी बँकेचे अध्यक्ष सुरेश घुले, उपाध्यक्ष रोहिणी तुपे, जेष्ठ संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.