सातारा – भारतीय स्टेट बॅंकेच्यावतीने येथील सैनिक स्कूल मैदानावर शुक्रवार, दि. 8 व शनिवार, दि. 9 रोजी सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत चावडी मेळा होणार आहे. या मेळ्यात खाद्यपदार्थांच स्टॉल, महिला बचत गटांच्या घरगुती उत्पादनांचे स्टॉल, बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल, कार व ट्रॅक्टर विक्रेत्यांचे स्टॉल, शेतीची अवजारे, उपकरणे, खते यांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
या मेळाव्यात महिलांसाठी विनामूल्य मेहंदी, बाळगोपाळांना फुग्यांशी विनामूल्य खेळण्याचा आनंद घेता येणार असून बांधकाम व्यावसायिकांकडून घरकुलांची माहिती देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी भूषण, मो. 7843082356 व गणेश, मो. 9960163577 यांच्याशी संपर्क साधावा. या मेळ्यास कुटुंबासमवेत भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.