\n

कोहलीने ६४ चेंडूंच्या खेळीत पाच चौकार मारले तर अय्यरने ५० चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला. उपाहारापूर्वी विराट कोहली (३८) आणि श्रेयस अय्यर (३१) यांनी ६७ धावांची भागीदारी केली होती, पण दिवसाच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्याच षटकात रबाडाने अय्यरला बोल्ड केले. चेंडू त्याच्या बॅट आणि पायामधून गेला आणि स्टंपला लागला. त्यानंतर त्याने कोहलीच्या मनात अनेक प्रकारचे चेंडू आत-बाहेर जावून संभ्रम निर्माण केला आणि चेंडू त्याच्या बॅटची बाहेरील कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातमज्यात गेला.

\n

काही आक्रमक फटके मारणाऱ्या रविचंद्रन अश्विन (८) आणि शार्दुल ठाकूर (२४) यांच्या विकेट घेत रबाडाने कसोटी क्रिकेटमध्ये १४व्यांदा आपले पंचक पूर्ण करण्याचा पराक्रम पूर्ण केला. शेवटच्या सत्रात जसप्रीत बुमराह भारतासाठी एक धाव घेतल्यानंतर येनसेनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. पण के.एल. राहुलने एक बाजू संभाळताना संधी मिळताच हात उघडत काही चांगले फटके मारले. सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या राहुलमुळेच भारतीय संघाची धावसंख्या २०० च्या पुढे गेली आहे.

\n

Test Cricket : गिलचे करिअर उद्ध्वस्त करू शकतो रोहितचा ‘हा’ निर्णय; असे आहेत मागील 6 डावांचे आकडे..

\n

\n

रबाडाची विक्रमी कामगिरी…

\n

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा आऊट करणारा गोलंदाज म्हणून न्यूझीलंडच्या टीम साऊथीची ओळख होती. परंतू या सामन्यात रोहितला बाद करत कागिसो रबाडाने पुढचे पाऊल टाकले आहे. टीम साऊदीने १२ वेळा रोहित शर्माला बाद केले होते, तर कागिसो रबाडाने त्याला मंगळवारी १३ वेळा बाद केले आहे. तर श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने रोहित शर्माला दहा वेळा बाद केले आहे. रोहित ९ वेळा ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनचा बळी ठरला आहे. तर न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने रोहितला आठ वेळा बाद केले आहे. या सामन्यात आऊट होण्यापूर्वी रोहित शर्माने १४ चेंडूत ५ धावा केल्या.

\n

कर्णधार टेम्बा बावुमा जखमी

\n

बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीच्या कव्हर ड्राईव्हचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा जखमी झाला. यामुळे त्याला मैदानाबाहेर पडावे लागले. त्यामुळे त्याच्या जागी आता एडेन मार्कराम कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. बावुमा नुकताच हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून परतला आहे. कर्णधार बावुमाच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. बावुमाने आफ्रिकेसाठी ५६ कसोटी सामन्यांमध्ये २९९७ धावा केल्या आहेत, ज्यात २ शतकांचा समावेश आहे. बावुमाने दक्षिण आफ्रिकेला एकट्याने अनेक सामने जिंकूण दिलेले आहेत.

\n

#SAvsIND 1st Test : द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जडेजाला का वगळलं? कर्णधार शर्माने सांगितले कारण..

\n

\n

संक्षिप्त धावफलक

\n

भारतः पहिला डावः ५९ षटकांत ८ बाद २०८ (विराट कोहली ३८, श्रेयस अय्यर ३१, शार्दूल ठाकूर २४, के.एल राहूल खेळत आहे ७०, मोहम्मद शमी खेळत आहे ०; कागिसो रबाडा ५-४४, नांद्रे बर्गर २-५०, मार्को जानसेन १-५२) वि.दक्षिण आफ्रिका.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#SAvsIND 1st Test Day 1 Stumps : रबाडाचा पंच! पहिल्या दिवसावर द. आफ्रिकेचं वर्चस्व, भारताचा निराशाजनक खेळ…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/vvsss.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/savsind-1st-test-day-1-stumps-south-africa-fast-bowler-kagiso-rabada-ran-through-the-indian-batting-order-on-day-1#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/vvsss.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/savsind-1st-test-day-1-stumps-south-africa-fast-bowler-kagiso-rabada-ran-through-the-indian-batting-order-on-day-1#webpage","name":"#SAvsIND 1st Test Day 1 Stumps : रबाडाचा पंच! पहिल्या दिवसावर द. आफ्रिकेचं वर्चस्व, भारताचा निराशाजनक खेळ…","url":"https://www.dainikprabhat.com/savsind-1st-test-day-1-stumps-south-africa-fast-bowler-kagiso-rabada-ran-through-the-indian-batting-order-on-day-1","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/savsind-1st-test-day-1-stumps-south-africa-fast-bowler-kagiso-rabada-ran-through-the-indian-batting-order-on-day-1#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/vvsss.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/savsind-1st-test-day-1-stumps-south-africa-fast-bowler-kagiso-rabada-ran-through-the-indian-batting-order-on-day-1#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/savsind-1st-test-day-1-stumps-south-africa-fast-bowler-kagiso-rabada-ran-through-the-indian-batting-order-on-day-1","name":"#SAvsIND 1st Test Day 1 Stumps : रबाडाचा पंच! पहिल्या दिवसावर द. आफ्रिकेचं वर्चस्व, भारताचा निराशाजनक खेळ…"}}]}}}

#SAvsIND 1st Test Day 1 Stumps : रबाडाचा पंच! पहिल्या दिवसावर द. आफ्रिकेचं वर्चस्व, भारताचा निराशाजनक खेळ…