Kagiso Rabada Smoking : कगिसो रबाडाचं हॉटेलमध्ये ‘धुंआ-धुंआ’? सिगारेट ओढतानाचा VIDEO व्हायरल झाल्याने क्रिकेट विश्वात खळबळ
Kagiso Rabada Smoking : गुजरात टायटन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Kagiso Rabada Smoking Video Controversy : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वेगाने पसरत आहे, ज्यामध्ये कगिसो रबाडासारखी दिसणारी व्यक्ती हॉटेलच्या खोलीत सिगरेट ओढताना दिसत आहे. हा व्हिडिओ गुजरात टायटन्सच्या टीम हॉटेलमधील असल्याचे म्हटले जात आहे, मात्र या व्हिडीओच्या सत्यतेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. व्हिडीओतील व्यक्ती रबाडाच आहे की त्याचा सारखा दिसणारा दुसरा कोणी, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
जुन्या वादाची पुन्हा चर्चा –
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर रबाडाचा जुना शिस्तभंग आणि वादाचा रेकॉर्ड पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या आयपीएल हंगामात रबाडाला ‘साउथ आफ्रिकन इन्स्टिट्यूट फॉर ड्रग फ्री स्पोर्ट्स’ने (SAIDS) एका महिन्यासाठी प्रतिबंधित केले होते. त्यावेळी रबाडा स्पर्धा मध्येच सोडून गेला होता. डोपिंग प्रकरणाची अधिकृत माहिती कधीही जाहीर झाली नव्हती, पण या नवीन व्हिडीओमुळे जुन्या संशयांना पुन्हा हवा मिळाली आहे.
KAGISO RABADA WAS SMOKING 🚬 🤯
– Kagiso Rabada was smoking & got got caught in camera. After seeing this Rashid Khan and GT’s players not happy with Rabada’s behaviour. Rashid Khan & staffs came and asked him, “What is this?” pic.twitter.com/zSYuzwygAb
— Cricket Central (@CricketCentrl) April 22, 2026
पर्पल कॅपच्या शर्यतीत रबाडा –
मैदानातील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर रबाडा सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत सातव्या क्रमांकावर आहे. त्याने ६ सामन्यांत १० विकेट्स घेतले आहेत. गुजरातचा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असून २४ एप्रिल रोजी त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी अशा प्रकारचा वाद समोर येणे गुजरातसाठी डोकेदुखी ठरू शकते.
चहलचाही व्हिडीओ झाला होता व्हायरल –
विशेष म्हणजे, या हंगामाच्या सुरुवातीला युझवेंद्र चहल याचाही गाडी चालवताना धुम्रपान करत असल्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओचीही पुष्टी झाली नव्हती, परंतु चाहत्यांनी खेळाडूंच्या अशा वर्तणुकीवर कडक टीका केली होती. आता रबाडाच्या बाबतीतही हा केवळ अफवेचा भाग आहे की वास्तव, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.





