SA W vs IND W : भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव! लॉरा वुल्वार्टचं वादळ अन् टीम इंडियाचं लोटांगण; मालिकाही गमावली
SA W vs IND W : या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला फक्त एक सामना जिंकता आला, उर्वरित चार सामने दक्षिण आफ्रिका संघाने जिंकले

SA W vs IND W South Africa Women Won Series : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या निर्णायक युद्धातही भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्वार्टच्या झंझावाती फलंदाजीसमोर भारतीय गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही नांगी टाकली, ज्यामुळे भारताला ही मालिका गमवावी लागली आहे.
भारतीय संघाचा मालिकेत दारुण पराभव –
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात भारताचा २३ धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत १५५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर देताना भारतीय महिला संघ २० षटकांत ९ बाद १३२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताच्या या पराभवाचे मुख्य कारण ठरली ती म्हणजे आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्वार्ट.
South Africa win the 5th T20I by 23 runs.
They clinch the #SAvIND T20I series by 4-1.
Scorecard ▶️ https://t.co/zwoncYxXno #TeamIndia pic.twitter.com/VBYkiDhLR7
— BCCI Women (@BCCIWomen) April 27, 2026
लॉरा वुल्वार्टचा वन मॅन शो –
Laura Wolvaardt’s 330 runs in this series against India are the most by a woman in any T20I series or tournament 🔥 pic.twitter.com/LoqA3aAwRp
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 27, 2026
लॉरा वुल्वार्टने ५६ चेंडूंत नाबाद ९२ धावांची स्फोटक खेळी केली. तिच्या या खेळीत ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तिने संपूर्ण मालिकेतील ५ सामन्यांत ८२.५ च्या सरासरीने ३३० धावा कुटल्या, ज्यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तिच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे तिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ या दोन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
भारताची सुमार फलंदाजी –
On the move 👊
Bharti Fulmali upping the ante 📈#TeamIndia 74/3 after 12 overs.
Updates ▶️ https://t.co/zwoncYxXno #SAvIND pic.twitter.com/ifFPF5VlCf
— BCCI Women (@BCCIWomen) April 27, 2026
१५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. स्फोटक फलंदाज शफाली वर्मा केवळ ४ धावांवर बाद झाली, तर जेमिमा रॉड्रिग्सला फक्त भोपळा फोडता (१ धाव) आला. भारती फूलमालीने ४० धावा करत थोडा संघर्ष केला, पण इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. अनुष्का शर्मा (१७), दीप्ती शर्मा (८) आणि अरुंधती रेड्डी (१) यांनी निराशा केली. यष्टिरक्षक ऋचा घोषने नाबाद २५ धावा केल्या, मात्र तोपर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता. दक्षिण आफ्रिकेकडून म्लाबा आणि डी क्लर्क यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.





