पुसेगाव – खटाव तालुक्यामध्ये रोजगार उद्योजकता मेळावा आयोजित करून अनेकांना रोजगार उपलब्ध केल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश यांचे कौतुक केले. आपण केलेल्या विधायक कार्यक्रमाने पक्षाची प्रतिमा उजळली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त वडूज, खटाव या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने वडूजमध्ये विविध मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योग जगत मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये दीडशे बेरोजगार युवकांना रोजगार मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते कुणाल गडांकुश यांनी दिली आहे. या मेळाव्याला भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम ,समाज कल्याण आयुक्त सातारा नितीन उबाळे, भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वैभव माने, रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, माजी समाज कल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्याला आलेल्या युवकांना ऑन द स्पॉट नियुक्ती पत्र देण्यात आले. सदरच्या मेळाव्याचे उद्घघाटन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष व सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी केले. या मेळाव्याला मदत फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रभारी माण तालुका अध्यक्ष मयूर बनसोडे, खटाव तालुकाध्यक्ष कुणाल गडांकुश, सरचिटणीस संतोष भंडारे, अनिता तोरणे,अजित नलावडे, अजित कंठे, आकाश खांडेकर, अमर झोडगे, शिवाजी तिडके, प्रकाश शेळके, नाथा कंठे ,सुरेश कोकाटे ,विकी शिंदे, रोशन जाधव, सचिन सुतार, प्रफुल ओव्हाळ, अविराज जाधव यांच्यासह उद्योजक व कुशल कारागीर उपस्थित होते.