पाचगणी – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर येथील पोलीस मैदानावर भरवण्यात आलेल्या महाबळेश्वर सैादर्य स्पर्धेमध्ये मिस महाबळेश्वर म्हणून प्रियांका काळे व मिसेस महाबळेश्वर म्हणून वर्षा पार्टे यांचा प्रथम क्रमांक आला.
महाबळेश्वर सौदर्य स्पर्धेच्या रंगतदार माहोलमुळे महिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. शहरातील विविध वयोगटातील महिलांनी महाबळेश्वर शहराच्या सौदर्य स्पर्धेत भाग घेतला असताना अभिनेत्री अक्षया देवधर यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेला चार चांद लावणारी होती.
महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी लावलेली हजेरी महिलांना आनंद देऊन गेली. स्पर्धेची प्रमुख आकर्षण ठरणारी डॅा. श्रद्धा गोंदकर यांनी महिलाच्या आरोग्याची काळजी घेणारी अद्ययावत लशीची नोंदणी केली. वय ८ ते २० पर्यत महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्याकरीता नवीन एचपीव्ही लशीची नोंदणीचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
मिस प्रियांका काळे व मिसेस वर्षा पार्टे यांनी समाजामध्ये स्त्री पुरुष समानता व दैनदिन जीवनामध्ये सोशल मिडीयाचा अतिरेक वापर किती घातकी आहे, याचे विवेचन करणारी समर्पक उत्तरे दिली. भांगडिया यांनी सादर केलेली मिमिक्री पोट धरुन हसवणारी होती.
प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर शहराचे सौदर्य स्पर्धेचे आयोजन झाले.