Maharashtra Politics : मोदींना हटवण्यासाठी भाजपमध्येच मोठं षडयंत्र; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Maharashtra Politics : संजय राऊत यांनी भाजपमध्ये मोठी फूट पडल्याचा दावा केला असून महिला आरक्षण विधेयकाच्या आडून ८५० खासदार करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.

Maharashtra Politics : महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून देशातील राजकारण तापले असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपविरोधात गंभीर आरोप करत खळबळ उडवली आहे. (Maharashtra Politics)
भाजपमध्येच अंतर्गत गटबाजी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून हटवण्यासाठी काही गट प्रयत्न करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. पुढे म्हणाले की, महिला आरक्षण विधेयक पाडले गेले नसून त्यामागे वेगळे राजकीय गणित आहे.
भाजपमधील काही गटांना मोदींना पंतप्रधानपदावरून दूर करण्याची घाई लागली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव सूचकपणे घेत “ते त्या गटात आहेत का, हे मला ठाऊक नाही,” असं राऊत यांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics)
देशात सत्तास्थानी राहण्यासाठी मोठे षडयंत्र
राऊतांनी पुढे दावा केला की, देशात सत्तास्थानी राहण्यासाठी मोठे राजकीय षडयंत्र रचले जात आहे. “सुमारे 850 खासदारांचा आकडा गाठण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यासाठी डिलिमिटेशनचा मार्ग वापरला जात आहे. महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून वेगळेच राजकारण केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
अमित शहा यांच्यावरही निशाणा
यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधत, “या विधेयकाचे सूत्रधार अमित शहा आहेत. डिलिमिटेशनच्या राजकारणाला महिला आरक्षणाचा रंग देण्यात आला,” अशी टीका केली. (Maharashtra Politics)
राज्यात एक कोटी महिलांच्या स्वाक्षऱ्या
दरम्यान, महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असून, महायुतीकडून राज्यात एक कोटी महिलांच्या स्वाक्षऱ्या गोळा करण्याचा आणि मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राऊतांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
हेही वाचा :
Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय! शरद पवारांच्या खासदारावर सोपवली महत्त्वाची जबाबदारी





