Sanjay Shirsat : महापालिकेची इमारत ‘भुतिया’, तिथे आत्मे वावरतात; महायुतीच्या मंत्र्याचा खळबळजनक दावा
Sanjay Shirsat : महायुतीमधील एका मंत्र्याने छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या इमारतीसंदर्भात एक धक्कादायक दावा केला आहे.

Sanjay Shirsat : महायुतीमधील एका मंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या इमारतीबाबत खळबळजनक दावा केला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“कब्रस्तानच्या जागेवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत उभी आहे. त्यामुळे इथे आत्म्यांचा वावर आहे. या आत्म्यातून मुक्ती हवी असेल तर इमारत इतर जागी बांधावी लागेल.” असे धक्कादायक विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे.
इथले आत्मे कधी कधी तुम्हाला डिवचतात. त्यामुळे तुम्ही बैचेन होतात, असा माझा समज आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच यामधून मुक्ती हवी असेल तर ही इमारत चांगल्या ठिकाणी करा, असा सल्लाही मंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यावर काय प्रतिक्रिया येतात याकडे लक्ष असणार आहे. Sanjay Shirsat
नेमकं काय म्हणाले शिरसाट?
ही महानगरपालिकेची इमारत स्थलांतरित झाली तर बरं होईल. महानगरपालिकेला ग्रहण लागायचं कारण म्हणजे इथे सगळे मुडदे गाडत होते, हा सगळा कब्रस्तानचा भाग आहे. नवीन इमारत झाली पाहिजे आत्म्यांना सुद्धा शांती मिळेल. जोपर्यंत मी पालकमंत्री आहे तोपर्यंत मी निधी देण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. आपणा दिल बडा आहे पाठीमागे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत, असेही मिश्किल विधान संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केले आहे.
राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता
एकीकडे राज्यात बहुचर्चित अशोक खरात प्रकरणाची चर्चा सुरू असून, या प्रकरणात अंद्धश्रेद्धाला पोसण्यात आले होते. अशातच महायुतीमधील एका मंत्र्याने अशा प्रकारचे विधान करणे आश्चर्यचकित करणारे आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढे काय घडामोडी होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Chiraiya web series: ‘चिरैया’ला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद! दिव्या दत्ता भावूक, सोशल मीडियावर मानले आभार






