PM Narendra Modi: संसदेत विरोधकांच्या विरोधामुळे महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. या संबोधनात पंतप्रधान महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि पुढील रणनीतीवर भाष्य करण्याची शक्यता आहे. संसदेतील राजकीय पेचप्रसंग (PM Narendra Modi) PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार शुक्रवारी लोकसभेत या घटनादुरुस्ती विधेयकावर मतदान झाले. मात्र, सरकारला आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत गाठता आले नाही. विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली, तर २३० सदस्यांनी विरोधात मतदान केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयक मंजूर झाले नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी जाहीर केले की, केंद्र सरकार या विधेयकाशी संबंधित इतर प्रक्रिया पुढे नेणार नाही. स्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात (PM Narendra Modi) माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या अपयशासाठी काँग्रेस आणि ‘इंडिया’ (INDIA) आघाडीवर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, “काँग्रेसने वर्षानुवर्षे महिलांना राजकीय हक्कांचे स्वप्न दाखवले, पण काल संसदेत त्यांच्याच आकांक्षांची पायमल्ली केली. भाजपकडे हे केवळ सत्तेचे राजकारण नसून समतेचा लढा आहे. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात महिलांना साध्या शौचालयांपासून आणि बँक खात्यांपासून वंचित ठेवण्यात आले होते.” इराणी यांनी पुढे म्हटले की, काँग्रेसने २०२३ च्या विधेयकाला पाठिंबा दर्शवला असला तरी, ‘सीमांकन’ (Delimitation) प्रक्रियेवर अविश्वास दाखवून आपली दुटप्पी भूमिका सिद्ध केली आहे. राहुल गांधींचे प्रत्युत्तर दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधकांचे समर्थन करताना भाजपवर ‘छुपा अजेंडा’ राबवल्याचा आरोप केला आहे. तामिळनाडूतील एका रॅलीत बोलताना ते म्हणाले, या विधेयकाचा संबंध सीमांकनाशी जोडून तामिळनाडू आणि इतर दक्षिण भारतीय राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी करण्याचा भाजपचा डाव होता. भारत हा राज्यांचा संघ आहे आणि प्रत्येक राज्याचा आवाज समान असला पाहिजे. देशभर पडसाद या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, भाजप आणि मित्रपक्षांनी ‘इंडिया’ आघाडीविरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. विरोधक महिलाविरोधी असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष पंतप्रधान मोदींच्या आज रात्रीच्या भाषणाकडे लागले आहे, ज्यातून सरकारची यापुढील भूमिका स्पष्ट होईल.