Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय! शरद पवारांच्या खासदारावर सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Narendra Modi : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय राष्ट्रीय समितीत कोल्हे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. (Narendra Modi)
या समितीचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असून, देशभरात महात्मा फुले यांच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. सुमारे 126 सदस्यीय या समितीत महाराष्ट्रातून डॉ. अमोल कोल्हे यांचा समावेश करण्यात आल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (Narendra Modi)
भारत सरकारकडून एप्रिल 2026 ते एप्रिल 2027 या कालावधीत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महात्मा फुले यांची 200 वी जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील मान्यवरांना समितीत स्थान देण्यात आले असून, त्यामध्ये कोल्हे यांची निवड झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Narendra Modi)





