“पाकिस्तान मला घरासारखे…” ; राहुल गांधींचे जवळचे सहकारी सॅम पित्रोदांचे वादग्रस्त विधान

Sam Pitroda। पाकिस्तानबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पित्रोदा यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी त्यांनी,”त्यांना पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमध्ये घरासारखे वाटते. ” असे म्हटले आहे. याशिवाय, भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत त्यांनी म्हटले की देशाचे परराष्ट्र धोरण शेजारील देशांवर केंद्रित असले पाहिजे” असेही म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी, “माझ्या मते, आपले परराष्ट्र धोरण आपल्या शेजारील देशांवर केंद्रित असले पाहिजे. आपण आपल्या शेजाऱ्यांशी आपले संबंध सुधारू शकतो का? मी पाकिस्तानला गेलो आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला तिथे घरी असल्यासारखे वाटते. मी बांगलादेश आणि नेपाळमध्येही राहिलो आहे आणि तिथेही मला घरी असल्यासारखे वाटते. जेव्हा मी या देशांना भेट देतो तेव्हा मला परदेशात असल्यासारखे वाटत नाही.”असे म्हटले आहे. Sam Pitroda।
Gen-Z यांना राहुल गांधींनी केलेल्या आवाहनाला उत्तर देताना पित्रोदा म्हणाले, “मी देशातील तरुणांना राहुल गांधींसोबत उभे राहण्याची आणि त्यांच्या आवाजाशी त्यांचा आवाज जुळवण्याची विनंती करू इच्छितो.” गेल्या वर्षी त्यांनी भारताच्या विविधतेबद्दल एक विधान केले होते, ज्यामुळे बरेच वाद निर्माण झाले होते. ते म्हणाले की, “भारत हा एक अतिशय वैविध्यपूर्ण देश आहे, जिथे पूर्व भारतातील लोक चिनी लोकांसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरब लोकांसारखे दिसतात, उत्तर भारतातील लोक गोरे लोकांसारखे दिसतात आणि दक्षिणेकडील लोक आफ्रिकन लोकांसारखे दिसतात. पण त्यामुळे काही फरक पडत नाही.”
ते म्हणाले की, “आम्ही वेगवेगळ्या भाषा, धर्म आणि चालीरीतींचा आदर करतो. हा तो भारत आहे ज्यावर मी विश्वास ठेवतो, जिथे प्रत्येकाचा आदर केला जातो आणि प्रत्येकजण थोडीशी तडजोड करतो.” या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
यापूर्वी, सॅम पित्रोदा यांच्या वारसा करावरील विधानामुळे वाद निर्माण झाला होता. काँग्रेस सत्तेत आल्यास कोणाची मालमत्ता आहे हे शोधण्यासाठी एक सर्वेक्षण केले जाईल या राहुल गांधींच्या टिप्पणीला उत्तर म्हणून त्यांनी हे विधान केले. त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना पित्रोदा यांनी अमेरिकेत लादलेल्या वारसा कराचा उल्लेख केला होता. Sam Pitroda।





