Rahul Gandhi : राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी; नितीन नवीन यांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगाविरोधात केलेल्या निदर्शनांवरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Rahul Gandhi : निवडणूक आयोगाविरोधात केलेल्या निदर्शनांवरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांची मानसिकता ‘अराजकतावादी’ असून ते समाजात ‘विष पसरवण्याचा’ प्रयत्न करत आहेत, असे नवीन म्हणाले.
बुधवारी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांच्या रस्त्यावरील निदर्शनांचे नेतृत्व केल्यानंतर राहुल गांधी यांना अनेक खासदारांसह पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले होते. यावर प्रतिक्रिया देताना नवीन यांनी खडे बोल सुनावले.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आक्षेप घेणाऱ्या राहुल गांधींना (Rahul Gandhi) आव्हान देताना नबीन यांनी केरळ आणि तमिळनाडूतील निवडणुकांचाही संदर्भ दिला. याच निवडणूक आयोगाने केरळ आणि तमिळनाडूतील निवडणुका घेतल्या. राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आधी राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. नवीन यांनी राहुल गांधींवर घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोपही केला.
भारताची संसाधने, संपत्ती आणि जमिनीवर भारतीयांचाच अधिकार असल्याचे सांगत, परकीय मानसिकता असलेल्या लोकांना देशात वसवण्याच्या प्रयत्नांना भाजप विरोध करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेशी संबंधित निर्णयांवर गेल्या १० महिन्यांत किमान १४ वेळा अधिकृत आक्षेप नोंदवले होते.
त्यानंतर काँग्रेसने (Rahul Gandhi) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, आयोगाने भिन्न मते ही संस्थात्मक चर्चेचा स्वाभाविक भाग असल्याचे स्पष्ट केले. त्यावरून सध्या इंडिया आघाडीने आक्रमक धोरण अवलंबताना, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.






