मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तो व्यस्त आहे. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: सलमानने सोशल मीडियाद्वारे ही माहिती शेअर केली आहे.
सलमानने सोशल मीडियावर त्याचा एक पाठमोरा उभा असलेला फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या पाठीवर पट्टी बांधलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “जेव्हा तुम्हाला वाटते की संपूर्ण जगाचा भार तुमच्या खांद्यावर आहे, त्यावेळी जगाला सोडा आणि पाच किलोच्या डंबलचे वजन उचलून दाखवा… टायगर जखमी आहे.” सलमानचा हा फोटो पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
सलमानच्या या फोटोवर ‘काळजी घे’, ‘जखमी टायगरपेक्षा खतरनाक कोणी असू शकत नाही’, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तसेच त्याची जखम लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करतआहेत. मात्र सलमानला कशामुळे ही दुखापत झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
Wen u think u r carrying the weight of the world on your shoulders , he says duniya ko chodo paanch kilo ka dumbbell utha ke dikhao .Tiger Zakhmi Hai . #Tiger3 pic.twitter.com/nyNahitd24
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 18, 2023
दरम्यान, ‘टायगर 3’ या सिनेमात सलमानसोबत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कॅफ आणि इमरान हाशमी देखील काम करणार आहेत. त्याचा हा सिनेमा येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सलमानच्या ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता ‘टायगर 3’ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का? हे पाहावे लागणार आहे.