नवी दिल्ली – तुम्ही अनेक पाळीव प्राणी प्रेमी पाहिले असतील. ते त्यांच्या पाळीव प्राण्यांना सर्व प्रकारच्या चैनीच्या वस्तू देण्याचा प्रयत्न करतात. मात्र आज आम्ही अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याने एका खास जातीचा कुत्रा विकत घेण्यासाठी थोडे थोडके नव्हे तर तब्बल 20 कोटी रुपये खर्च केले. या कुत्र्याच्या हायप्रोफाइल विक्रीची कहाणी खळबळजनक बातमी बनली आहे. या कुत्र्याची (कॉकेशियन शेफर्ड डॉग) किंमत ऐकून लोक थक्क झाले.
आम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत त्याचे नाव एस. सतीश आहे. जे इंडियन डॉग ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि बेंगळुरूमधील एका केनेलचे मालक आहेत. हैदराबादमधील एका ब्रीडरकडून त्यांनी भारतातील दुर्मिळ जातीचा कुत्रा विकत घेतला आहे. हा कॉकेशियन शेफर्ड कुत्रा आहे. ज्याचे नाव ‘कॅडबॉम हैदर’ असे आहे. हा सर्वोत्तम जातीचा कुत्रा आहे.
बातमीनुसार, ‘कॅडबॉम हैदर’ कुत्र्याचे वय दीड वर्षे आहे. त्रिवेंद्रम आणि आणखी एका डॉग शोमध्येही तो सहभागी झाला होता. विशेष म्हणजे या स्पर्धेत त्याने अनेक पदकेही जिंकली. कुत्र्याचे मालक सतीश यांनी सांगितले की, ‘कॅडबॉम हैदर’ आकाराने खूप मोठा आहे. हा एक अतिशय प्रेमळ कुत्रा आहे. तो घरी आरामात राहतो.
कॅडबॉम हैदरची खासियत
सतीश यांनी 1 कोटी रुपयांना खरेदी केलेला कोरियन डोसा मास्टिफ,10 कोटी रुपयांचा तिबेटी मास्टिफ आणि 8 कोटी रुपयांना खरेदी केलेला अलास्कन मालामुटही आहे. त्यांनी हे कुत्रे चीनमधून आणले होते. त्यांनी विमानतळावरून एका आलिशान कारमधून कुत्र्याला घरी आणले. कॉकेशियन शेफर्ड डॉगबद्दल बोलायचे तर, त्याची सरासरी उंची सुमारे 30 इंच आणि त्याचे वजन 55 ते 77 किलो पर्यंत असू शकते. ते 10 ते 20 वर्षे जगतात.
आतापर्यंत 32 पदके जिंकली
कॉकेशियन शेफर्ड या कुत्र्याच्या प्रजातीचे जतन करण्याचा उपक्रम जगभरात सुरू आहे. ही ब्रीड खूप महाग आहे. या जातीचे कुत्रे त्यांच्या आकर्षक दिसण्यासाठी ओळखले जातात. याशिवाय या कुत्र्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ‘केडबॉम हैदर’ने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये ‘बेस्ट डॉग ब्रीड’साठी एकूण 32 पदके जिंकली आहेत.सतीश हे ‘कॅडबॉम्स कॅनेल’ नावाची संस्थाही चालवतात. ही संस्था कुत्र्यांचे आयात, प्रजनन आणि डॉग शोमध्ये दाखवण्याचे काम करते.