RR vs RCB : पिंक सिटीत ग्रीन जर्सी परिधान करुन का उतरली आरसीबी? कारण जाणून कराल कौतुक

RR vs RCB Why RCB wear green jersey against RR match in IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील २८वा सामना सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे यजमान राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना बंगळुरु समोर १७४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात, आरसीबी त्यांच्या नेहमीच्या लाल रंगाच्या जर्सीऐवजी हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला. अचानक हा बदल का केला आणि त्या मागे काय कारण आहे? जाणून घेऊया.
आरसीबीने हिरव्या रंगाची जर्सी का घातली?
आरसीबीने २०११ मध्ये गो ग्रीन मोहीम सुरू केली. या कारणास्तव, संघ दर हंगामात एक सामना हिरव्या रंगाची जर्सी घालून खेळतो. पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, संघ पुनर्वापर केलेल्या कपड्यांपासून बनवलेली हिरवी जर्सी घालतो. या संघाचे ध्येय केवळ कार्बन-न्यूट्रल बनणे नाही, तर कार्बन-पॉझिटिव्ह फ्रँचायझी बनणे आहे. झाडे लावण्याबाबत लोकांना जागरूक करणे हा देखील त्याचा उद्देश आहे.
ग्रीन जर्सीमध्ये आरसीबीचा कसा आहे विक्रम?
If RCB Win today match 🔥 I will give 1555 Rupees to everyone who likes this tweet 🙏#RRvsRCB #RCBvsRR pic.twitter.com/2DuQ0Gaqv9
— Swami⚡ (@Yor__xve) April 13, 2025
हिरव्या रंगाच्य जर्सीमध्ये आरसीबीची कामगिरी चांगली राहिलेली नाही. या जर्सीमध्ये संघाने आतापर्यंत १४ सामने खेळले आहेत. त्याने यापैकी फक्त ४ जिंकले आहेत. त्याच वेळी, त्यांना ९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. असाही एक सामना होता ज्याचा निकाल लागला नाही. हिरव्या जर्सीमध्ये आरसीबीची सर्वोत्तम धावसंख्या ३ बाद २४८ धावा आहे. त्यांनी ही धावसंख्या २०१६ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध उभारली होती. त्याच वेळी, सर्वात कमी धावसंख्या ९२ धावा आहे. जी त्यांनी २०२१ मध्ये केकेआरविरुद्ध नोंदवली होती.
हेही वाचा – SRH vs PBKS : “खरं सांगायचं तर, सामन्याच्या चार दिवस आधी मी…’, अभिषेकचा शतकाबद्दल मोठा खुलासा
जैस्वालच्या जोरावर राजस्थानने उभारली सन्मानजनक धावसंख्या –
सामन्याबद्दल बोलायचे, तर यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकाच्या मदतीने राजस्थान रॉयल्सने आरसीबीसमोर १७४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वीने शानदार फलंदाजी केली आणि ४७ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७५ धावा केल्या, ज्यामुळे राजस्थानला २० षटकांत चार गडी बाद १७३ धावा करण्यात यश आले. राजस्थानकडून यशस्वी व्यतिरिक्त ध्रुव जुरेलने २३ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ३५ धावा केल्या. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल आणि क्रृणाल पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





