Brijesh Sharma : २,००० किलोमीटर दूर येऊन गाजवलं मैदान! कोण आहे बृजेश शर्मा? ज्याच्या फिरकीपुढे RCB चे दिग्गज फलंदाज झाले हतबल
Brijesh Sharma : आयपीएलमध्ये दरवर्षी काही खेळाडू आपल्या जिद्दीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करतात. राजस्थान रॉयल्सचा २७ वर्षीय फिरकीपटू बृजेश शर्मा याची कहाणीही अशीच काहीशी आहे

Who is Brijesh Sharma Rajasthan Royals IPL 2026 : आयपीएल २०२६ चा हंगाम दररोज नव्या हिरोला जन्म देत आहे. मुकुल चौधरीच्या स्फोटक फटकेबाजीनंतर आता राजस्थान रॉयल्सच्या (RR) ताफ्यातील एका नव्या गोलंदाजाने संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. बृजेश शर्मा असे या खेळाडूचे नाव असून, आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या फिरकीने सर्वांना थक्क केले.
आयपीएलमध्ये दरवर्षी काही खेळाडू आपल्या जिद्दीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करतात. राजस्थान रॉयल्सचा २७ वर्षीय फिरकीपटू बृजेश शर्मा याची कहाणीही अशीच काहीशी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात बृजेशने जितेश शर्मा आणि टिम डेव्हिड यांसारख्या मोठ्या फलंदाजांना बाद करून आरसीबीच्या फलंदाजीचा कणा मोडला. या कामगिरीनंतर आता सोशल मीडियावर “कोण आहे हा बृजेश शर्मा?” अशी चर्चा रंगू लागली आहे.
🚨RCB 6th wikect Gone Tim David 13 (9) Big breakthrough RR
– What a bowling Brijesh Sharma Massive 2nd Wikect strike RR
– RCB score 119-6 #RCBvsRR #brijeshsharma pic.twitter.com/vIjEGuuUo1
— Cricket Hindustan (@goldensports98) April 10, 2026
जम्मू ते दिल्ली आणि बंगाल ते आयपीएल –
Shimron Hetmyer grabs it clean! 🔥#TimDavid departs as #BrijeshSharma strikes 💥
Big moment in the game.#RRvsRCB pic.twitter.com/I8kAId7Boi
— The Buzz Filter (@TheBuzzFilter) April 10, 2026
१९९८ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये जन्मलेल्या बृजेशचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता. त्याने जम्मूमधूनच अंडर-१५ आणि अंडर-१९ स्तरावर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मात्र, अधिक संधींच्या शोधात तो घर सोडून ट्रेनने दिल्लीला पोहोचला. तिथे दीपक पुनिया यांच्या अकादमीत सराव केल्यानंतर त्याने घरून दोन हजार किलोमीटर दूर असलेल्या बंगालमध्ये आपली ओळख निर्माण केली. ‘बंगाल प्रो टी-२०’ लीगमध्ये मालदा स्मॅशर्सकडून खेळताना ७ सामन्यांत ११ विकेट्स घेत त्याने राजस्थान रॉयल्सच्या निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.
हेही वाचा – Phil Salt Record : फिल सॉल्टचा ‘गोल्डन डक’ धमाका! आयपीएलमध्ये ‘या’ ३ संघाकडून खेळताना नोंदवला नकोसा विक्रम
३० लाखांच्या बेस प्राईसवर राजस्थानमध्ये एन्ट्री –
The slide continues for Royal Challengers Bengaluru as Brijesh Sharma sends Jitesh Sharma back to the pavilion. Jitesh Sharma was manifesting for a match winning knock and getting the limelight, wishing for the colapse of the top order to get batting, Today, the top order gave… pic.twitter.com/hlYvxPyWZB
— Gaurav kumar (@gaurxv_k) April 10, 2026
बृजेशच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्सने त्याला ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर आपल्या संघात सामील केले. त्याने मिळालेल्या संधीचे सोने करत आतापर्यंत दोन सामन्यांत तीन महत्त्वाचे विकेट्स घेतल्या आहेत. सध्या तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करतो. जम्मू-काश्मीरमधून निघालेला हा तरुण आता आयपीएलच्या मोठ्या मंचावर आपल्या फिरकीची जादू दाखवत असून, आगामी काळात तो भारतीय क्रिकेटचा एक महत्त्वाचा चेहरा ठरू शकतो.





