RR vs RCB : वैभव-ध्रुवच्या वादळात विराटच्या आरसीबीची वाताहत! सलग चौथ्या विजयासह राजस्थानचा गुणतालिकेत दबदबा
RR vs RCB : वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाने आज आरसीबीच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या.

RR vs RCB Rajasthan Royals beat RCB by 6 Wickets : आयपीएल २०२६ च्या १६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) आपला विजयाचा धडाका कायम राखत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) ६ गडी राखून धुव्वा उडवला. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पावसाने काही काळ व्यत्यय आणला, मात्र मैदानात वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाने आरसीबीच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. यानंतर ध्रुव जुरेलच्या शानदार फिनिशिंग टचच्या जोरावर राजस्थान सलग चौथ विजय नोंदवला
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली, जेव्हा जोफ्रा आर्चरने पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टला बाद केले. मात्र, कर्णधार रजत पाटीदार (६३) आणि विराट कोहली (३२) यांनी डाव सावरला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या व्यंकटेश अय्यरने २९ धावांचे योगदान दिल्याने आरसीबीने २० षटकांत ८ बाद २०१ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई आणि बृजेश शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
𝙐𝙣𝙗𝙚𝙖𝙩𝙚𝙣 & 𝙐𝙣𝙨𝙩𝙤𝙥𝙥𝙖𝙗𝙡𝙚 🫡
A sensational win for #RR to sign off from Guwahati in style 🩷
Scorecard ▶️ https://t.co/X76bJjmq1j#TATAIPL | #KhelBindaas | #RRvRCB | @rajasthanroyals pic.twitter.com/eNq8gglcrL
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2026
वैभवचा ३०० च्या स्ट्राईक रेटने प्रहार –
7️⃣4️⃣ runs from boundaries alone 🤯
Operating at a ridiculous strike rate of 3️⃣0️⃣0️⃣
UNREAL stuff from Vaibhav Sooryavanshi! 🔥
Updates ▶️ https://t.co/X76bJjmq1j#KhelBindaas | #RRvRCB | @rajasthanroyals | @Vaibhavsooryava pic.twitter.com/RQqZU1zPud
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2026
प्रत्युत्तरात २०२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने अविश्वसनीय फलंदाजी केली. त्याने केवळ २६ चेंडूंत ७८ धावा कुटल्या, ज्यात ८ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. ३०० च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या वैभवने आरसीबीच्या गोलंदाजांना मैदानाबाहेर फेकून दिले. त्याने ध्रुव जुरेलसोबत दुसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची वेगवान भागीदारी केली आणि सामना एकतर्फी केला.
ध्रुव जुरेलचा जबरदस्त फिनिशिंग टच –
50 UP FOR DHRUV JUREL! 👏
The #RR wicketkeeper gets to his 6th #TATAIPL half-century off only 25 balls 👌
Updates ▶️ https://t.co/X76bJjmq1j#KhelBindaas | #RRvRCB | @rajasthanroyals pic.twitter.com/jxbBSO8bAX
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2026
वैभव बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेलने सूत्रे हाती घेतली आणि ४३ चेंडूंत नाबाद ८१ धावांची मॅचविनिंग खेळी साकारली. रवींद्र जडेजाच्या सोबतीने (२४*) त्याने १७.५ षटकांतच विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सचा या हंगामातील हा सलग चौथा विजय असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. दुसरीकडे, सलग दोन विजय मिळवणाऱ्या आरसीबीला या हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.





