Virat Kohli Dance : मैदानात ‘किंग’ कोहलीचा नागिन डान्स! राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वीचा VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli Dance : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यानंतर विराट कोहलीचा नागिन डान्स व्हिडीओ व्हायरल.

Virat Kohli Nagin Dance Video Viral IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या १६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आपला विजयाचा धडाका कायम राखत आरसीबीचा ६ गडी राखून पराभव केला. मात्र, या सामन्यात विजया इतकीच चर्चा विराट कोहलीच्या एका मजेशीर व्हिडिओची रंगली आहे ज्यामध्ये विराट कोहली मैदानात चक्क ‘नागिन डान्स’ करताना दिसत आहे, ज्याने चाहत्यांचे तुफान मनोरंजन केले. Virat Kohli Dance
१० एप्रिल रोजी गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यात हाय-व्होल्टेज मुकाबला पार पडला. सामना सुरू होण्यापूर्वी आरसीबीचे (RCB) खेळाडू जेव्हा सराव करत होते, तेव्हा विराट कोहली (Virat Kohali) एका वेगळ्याच मूडमध्ये दिसला. वॉर्मअप सुरू असताना विराटने अचानक ‘नागिन डान्स’ च्या स्टेप्स करायला सुरुवात केली. विराटचा हा हटके अंदाज पाहून स्टँड्समध्ये बसलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. कोहलीचा हा मजेशीर व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. Virat Kohli Dance
Virat Kohli funny nagin dance.😂 pic.twitter.com/FfMebuq5Vy
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) April 10, 2026
विराटची फटकेबाजी, पण राजस्थान भारी – Virat Kohli Dance
सरावादरम्यान मौजमजा करणाऱ्या विराटला प्रत्यक्ष सामन्यात मात्र मोठी खेळी साकारता आली नाही. त्याने १६ चेंडूंत ३२ धावांची वेगवान खेळी केली. आरसीबीने २० षटकांत २०१ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, राजस्थानच्या वैभव सूर्यवंशी (७८) आणि ध्रुव जुरेलच्या (८१*) स्फोटक खेळीच्या जोरावर हे लक्ष्य १८ व्या षटकातच पार करण्यात आले. राजस्थान रॉयल्सने या हंगामातील आपला चौथा विजय नोंदवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
आता मुंबई इंडियन्सचे आव्हान –
राजस्थानविरुद्ध पराभव झाला असला, तरी आरसीबीचा संघ ३ सामन्यांतील ४ गुणांसह आणि +१.२३१ या भक्कम नेट रनरेटसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीचा आता पुढील सामना १२ एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. या ‘हाय-प्रोफाइल’ सामन्यात विराट पुन्हा एकदा आपल्या बॅटने धमाका करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Virat Kohli Dance





