RR vs KKR : क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या जोरावर KKR ने उघडले विजयाचे खाते, राजस्थानचा सलग दुसरा पराभव

RR vs KKR Kolkata Knight Riders beat Rajasthan Royals by 8 wickets : आयपीएल २०२५ च्या सहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा ८ गडी राखून पराभव केला. यासह कोलकाता संघाने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली आयपीएलच्या १८व्या हंगामातील आपले विजयाचे खाते उघडले. केकेआर संघासाठी क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ९७ धावांचे योगदान दिले. तसेच राजस्थानचा हा सलग दुसरा पराभव आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ९ गडी गमावून १५१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, केकेआरने १८ व्या षटकात फक्त दोन गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. कोलकाताच्या विजयाचा नायक क्विंटन डी कॉक ठरला, ज्याने कोलकातासाठी पहिल्यांदाच अर्धशतक झळकावले. डी कॉकने ६१ चेंडूत ९७ धावांची नाबाद खेळी केली, त्याचे शतक हुकले पण खेळी खूप खास राहिली. कारण गुवाहाटीची खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती आणि त्याने क्रीजवर टिकून राहत केकेआरला हंगामातील पहिला विजय मिळवून दिला.
They get off the mark in #TATAIPL 2025 😎✅
A comprehensive show with both bat and ball for the defending champions @KKRiders in Guwahati 💜
Scorecard ▶ https://t.co/lGpYvw87IR#RRvKKR pic.twitter.com/4p2tukzLau
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2025
एकटा डी कॉक राजस्थानवर पडला भारी –
𝙑𝙞𝙣𝙩𝙖𝙜𝙚 QDK 😍
Quinton De Kock bags the 'Player of the Match' award for his rock solid unbeaten innings of 97(61) 👏👏
Scorecard ▶ https://t.co/lGpYvw87IR#TATAIPL | #RRvKKR | @KKRiders pic.twitter.com/Gh4edyDcmo
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2025
गुवाहाटीच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते आणि पॉवरप्लेमध्ये कोलकाताने संथ सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये केकेआरला फक्त ४० धावा करता आल्या, त्यांनी ७.४ षटकांत ५० धावा पूर्ण केल्या. मोईन अली आणि अजिंक्य रहाणे अडचणीत दिसत होते, पण डी कॉकची फटकेबाजी थांबली नाही. त्याने ३६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, ज्यामध्ये ३ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. त्यानंतर डी कॉकने अंगक्रिशसोबत फक्त ३० चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली आणि येथून राजस्थानचा पराभव निश्चित झाला.
हेही वाचा – RR vs KKR : एक चूक अन् संजू सॅमसन क्लीन बोल्ड! केकेआरच्या युवा गोलंदाजासमोर टेकले गुडघे, VIDEO व्हायरल
राजस्थान रॉयल्सची निराशाजनक कामगिरी –
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक गमावली आणि येथून त्यांच्या समस्या सुरू झाल्या. सॅमसन आणि जैस्वाल यांनी संघाला जलद सुरुवात दिली पण चौथ्या षटकात वैभव अरोराने विकेट घेत केकेआरला पहिले यश मिळवून दिले. सॅमसन बाद झाल्यानंतर रियान परागने वेगवान फलंदाजी केली पण यादरम्यान यशस्वी जयस्वाल २९ धावांवर बाद झाला. रियान परागलाही वरुण चक्रवर्तीने २५ धावांवर बाद केले. नितीश राणा देखील फक्त ८ धावा करू शकला. हसरंगाने ४ धावा केल्या. ध्रुव जुरेलने कसा तरी ३३ धावा केल्या आणि राजस्थान संघाने १५० धावांचा टप्पा ओलांडला.
कोलकाताच्या फिरकीपटूंनी केली कमाल –
कोलकाताच्या विजयाचे हिरो फिरकी गोलंदाज होते. वरुण चक्रवर्तीने ४ षटकांत फक्त १७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. मोईन अलीनेही २३ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. हर्षित राणा आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. जेव्हा वरुण चक्रवर्ती गोलंदाजी करायला आला, तेव्हा रियान परागने त्याच्या तिसऱ्या चेंडूवर एक लांब षटकार मारला पण दोन चेंडूंनंतर त्याने या खेळाडूला बाद केले. यानंतर, चक्रवर्तीने एक अद्भुत चक्रव्यूह निर्माण केले आणि त्यामध्ये राजस्थानचे खेळाडू अडकत गेले. त्याने चौथ्या षटकाच्या अखेरीस त्याने १३ डॉट बॉल टाकले. म्हणजे, या खेळाडूने २.१ षटकात एकही धाव दिली नाही, जी टी-२० क्रिकेटमध्ये मोठी गोष्ट आहे.





