Sanju Samson : संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडून सीएसकेमध्ये सामील होणार? रिपोर्टमधून मोठं सत्य आलं समोर

सॅमसनच्या निर्णयामुळे खळबळ –
संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स सोडण्याचा निर्णय घेतला असून, त्याने फ्रँचायझीला स्वतःला ट्रेड करण्याची किंवा रिलीज करण्याची विनंती केली आहे. आयपीएल 2025 चा हंगाम संपल्यानंतरच अशा चर्चांना सुरुवात झाली होती की, सॅमसन यापुढे राजस्थान रॉयल्सचा भाग राहणार नाही. काही अफवांनुसार, तो चेन्नई सुपर किंग्जकडे जाऊ शकतो, असेही बोलले जात होते. दोन्ही फ्रँचायझींमध्ये या स्टार खेळाडूच्या ट्रेडबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात होते. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नव्हती. पण आता झाली आहे.
सॅमसनने फ्रँचायझीला निर्णय कळवला –
Sanju samson #sanjusamson #rajisthanroyals pic.twitter.com/aePNyyisFL
— RVCJ Sports (@RVCJ_Sports) August 7, 2025
आता क्रिकबझच्या एका अहवालात सॅमसनच्या कुटुंबीय आणि त्याच्यासोबत खेळलेल्या खेळाडूंच्या हवाल्याने खुलासा झाला आहे की, सॅमसनने राजस्थान रॉयल्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अहवालानुसार, सॅमसनने राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाला औपचारिकपणे संघ सोडण्याचा आपला निर्णय कळवला आहे. त्याने फ्रँचायझीला विनंती केली आहे की, त्याला दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये ट्रेड करावे किंवा मिनी लिलावासाठी रिलीज करावे. या अहवालात असेही नमूद आहे की, सॅमसन आणि फ्रँचायझी व्यवस्थापनात गंभीर मतभेद आहेत, ज्यामुळे त्याने हा मोठा निर्णय घेतला आहे.
सॅमसनचा राजस्थान रॉयल्समधील प्रवास –
संजू सॅमसन गेल्या 8 हंगामांपासून सातत्याने राजस्थान रॉयल्सचा हिस्सा आहे. त्याने 2013 मध्ये याच संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि सलग तीन हंगाम खेळला. 2016 आणि 2017 मध्ये राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांचा बंदी घातली गेली, तेव्हा सॅमसन दिल्ली डेयरडेव्हिल्सकडून खेळला. मात्र, 2018 मध्ये राजस्थानच्या पुनरागमनानंतर तो पुन्हा या संघात सामील झाला आणि तेव्हापासून तो संघाचा अविभाज्य भाग आहे.
हेही वाचा – MS Dhoni : धोनी आणि CSK; अटूट बंधन, आयपीएल निवृत्तीच्या चर्चांवर प्रेमाची मोहोर, VIDEO होतोय व्हायरल
2021 मध्ये फ्रँचायझीने सॅमसनला कर्णधार बनवले. त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थानने 14 वर्षांनंतर 2022 मध्ये आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला होता. सॅमसनच्या या निर्णयामुळे आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वीच खळबळ उडाली आहे. आता तो कोणत्या फ्रँचायझीकडे जाणार आणि त्याच्या जागी राजस्थान कोणाला कर्णधार बनवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





