RR vs KKR : एक चूक अन् संजू सॅमसन क्लीन बोल्ड! केकेआरच्या युवा गोलंदाजासमोर टेकले गुडघे, VIDEO व्हायरल

RR vs KKR Sanju Samson clean bowled by Vaibhav Arora : आयपीएल २०२५ चा सहावा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करतानाता राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर १५२ धावांचे लक्ष्य ठेवले. राजस्थानची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, सातत्याने विकेट्स गमावल्याने संघ अडचणीत आला. दरम्यान संजू सॅमसनला केकेआरच्या युवा खेळाडूने क्लीन बोल्ड केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
केकेआरच्या युवा खेळाडूने संजूला केले क्लीन बोल्ड –
https://twitter.com/kuchnahi1269083/status/1904901228687200518
३.५ व्या षटकात, संजू सॅमसनने केकेआरचा वेगवान गोलंदाज वैभव अरोराच्या गोलंदाजीवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो क्लीन बोल्ड झाला. खरंतर, संजूने अरोराच्या चेंडूवर पुढे सरकून मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण या काळात त्याने एक मोठी चूक केली. संजू ओव्हरपिच चेंडूवर पुढे सरसावला, ज्यामुळे ओव्हरपिच चेंडू यॉर्करमध्ये रुपांतरीत झाला आणि तो क्लीन बोल्ड झाला. या सामन्यात संजू चांगल्या लयीत दिसत नव्हता. त्याने ११ चेंडूत १३ धावांची खेळी केली.
राजस्थानची टॉप ऑर्डर सपशेल अपयशी ठरली –
राजस्थानच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी साफ निराशा केली. यशस्वी जयस्वालने २४ चेंडूत २९ धावा केल्या आणि तो मोईन अलीचा बळी ठरला. याशिवाय रियान परागलाही मोठी खेळी करता आली नाही. तो १५ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. याशिवाय चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नितीश राणाने ९ चेंडूत ८ धावा केल्या. या सामन्यात राजस्थानचे टॉप ४ फलंदाज फारसे काही करू शकले नाहीत.
हेही वाचा – LSG vs DC : ‘एक ही तो शॉट आता है…’, कुलदीपने चौकार मारल्यानंतर ऋषभ-अक्षरने घेतली त्याची फिरकी, पाहा VIDEO
ध्रुव जुरेलने सर्वाधिक ३३ धावांचे योगदान दिले –
अशा प्रकारे कोलकाताच्या घातक गोलंदाजीसमोर राजस्थानचा संघ १५१ धावांपर्यंत पोहोचू शकला. रियान परागच्या नेतृत्त्वाखाली संघाने २० षटकांत नऊ गडी गमावून १५२ धावांचे लक्ष्य ठेवले. राजस्थानसाठी ध्रुव जुरेलने सर्वाधिक ३३ धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त कोणत्या फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. केकेआरकडून वैभव अरोरा, हर्षित राणा, मोईन अली आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्याच वेळी, स्पेन्सर जॉन्सनला शेवटच्या षटकात जोफ्रा आर्चरच्या रूपात यश मिळाले.





