अकोले, (प्रतिनिधी)- रोटरी क्लब अकोले सेन्ट्रलच्या वतीने देण्यात येणारा रोटरी जीवन गौरव व राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्कार वितरण तसेच रोटरी की पाठशाला अंतर्गत तालुक्यातील 14 जि. प. प्रा. शाळांना लायब्ररी वितरण सोहळा .
दि. 29 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता अकोले पंचायत समिती सभागृहात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती रोटरीचे अध्यक्ष सुनिल नवले व सेक्रेटरी विद्याचंद्र सातपुते यांनी दिली.
तालुक्यातील प्रगतशील शेतकरी रामदास गणपत मालुंजकर, दशरथ कोंडाजी एखंडे, विलास पंढरीनाथ शेळके यांना कृषी जीवन गौरव पुरस्कार तसेच आयुर्वेदिक औषध देणारे कै.नामदेव पांडुरंग वाकचौरे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार .
तर जिल्हा परिषदेतील उपक्रमशील शिक्षक संजय धोंडिबा गोर्डे, मीना रामजी जाधव, नंदा रेवजी कातोरे, नामदेव किसन सोंगाळ व विलास दशरथ ढोले यांना राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्कार देण्यात येणार आहे.