Rohit Sharma Fail : रोहित शर्मा आरसीबीसमोर पुन्हा अपयशी! ८ वर्षांचा वनवास कायम; धोनीच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी
Rohit Sharma Fail : रोहित शर्माला पुन्हा एकदा आरसीबीविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयश आले.

Rohit Sharma Fails against RCB after 8 years : आयपीएल २०२६ च्या ५४ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि आरसीबी आमने-सामने आले होते. या सामन्यात मुंबईची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर रायन रिकल्टन अवघ्या २ धावांवर बाद झाला. त्यानंतर अनुभवी रोहित शर्माने २२०.०० च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र पुन्हा एकदा त्याला आरसीबीविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयश आले. विशेष म्हणजे, आरसीबीविरुद्ध रोहितच्या बॅटमधून गेल्या ८ वर्षांपासून एकही अर्धशतक आलेले नाही.
१० चेंडूत २२ धावा अन् रोहित बाद –
रोहित शर्माने या सामन्यात १० चेंडूत २२ धावांची खेळी केली. त्याने २ चौकार आणि २ उत्तुंग षटकार खेचत आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, भुवनेश्वर कुमारच्या एका शानदार चेंडूवर जितेश शर्माने त्याचा झेल टिपला आणि रोहितची खेळी संपुष्टात आली. आरसीबीविरुद्ध ही त्याची सलग १३ वी खेळी होती, ज्यामध्ये त्याला पन्नास धावांच्या पार जाता आले नाही. रोहितने आरसीबीविरुद्ध शेवटचे अर्धशतक २०१८ मध्ये वानखेडे स्टेडियमवर झळकावले होते (९४ धावा), तेव्हापासून तो या संघाविरुद्ध चाचपडताना दिसत आहे.
The pitch where no one else has crossed 150 SR there is one man who can make batting look so easy that Rohit Sharma was striking at 220. The bowling from Bhuvi was so clinical today that others also would not have survived that long. pic.twitter.com/WW6mok6eqo
— Sagarika Dixit (@saga__r) May 10, 2026
धोनीच्या महाविक्रमाशी केली बरोबरी –
आरसीबीविरुद्ध वैयक्तिक धावांमध्ये अपयशी ठरला असला, तरी रोहितने आयपीएलमध्ये एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे. या सामन्यासह रोहितने आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याच्या महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहितच्या नावावर आता २७८ आयपीएल सामने जमा झाले असून, त्याच्यासोबतच विराट कोहलीनेही या विक्रमाची बरोबरी केली आहे.
हेही वाचा – Virat Kohli Video : उर्विल पटेलच्या बॅटिंगची किंग कोहलीलाही पडली भुरळ! डगआऊटमधील टीव्हीवर पाहत होता ‘सिक्सर किंग’चा थरार
रोहितने या हंगामात आतापर्यंत ६ सामन्यांत ४८.६० च्या सरासरीने २४३ धावा केल्या असून त्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, ३६ सामन्यांत ८८९ धावा करणाऱ्या या दिग्गज खेळाडूला आरसीबीविरुद्धची ८ वर्षांची ‘उणीव’ कधी भरून काढता येईल, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे





