Olympics Cricket Rules : लॉस एंजिल्स ऑलिम्पिक २०२८ साठी भारतीय महिला संघाची थेट एन्ट्री! ICC आणि IOC ने जाहीर केली नियमावली
Olympics Cricket Rules : नुकत्याच संपलेल्या महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधील कामगिरीच्या आधारे पहिल्या ४ महिला संघांची जागा पक्की झाली आहे.

Indian Womens Team Qualifies LA28 Olympics Cricket Rules : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांनी संयुक्तपणे २०२८ च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमधील (LA28) क्रिकेटच्या पुनरागमनासाठी पात्रता नियमांची घोषणा केली आहे. ऑलिम्पिकमध्ये संघ कसे पात्र ठरतील, याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. तसेच पात्रतेची शेवटची संधी म्हणून पहिल्यांदाच एक विशेष ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा देखील आयोजित केली जाणार आहे. मात्र, भारतीय महिला संघाची थेट एन्ट्री झाली आहे.
टी-२० फॉर्मेट आणि केवळ ६ संघांना संधी!
लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमधील क्रिकेटचे सर्व सामने टी-२० फॉर्मेटमध्ये खेळवले जातील. या ऐतिहासिक स्पर्धेत जगभरातून केवळ ६ पुरुष आणि ६ महिला संघांनाच खेळण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओशिनिया अशा वेगवेगळ्या खंडांतील सर्वोत्तम संघांचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे.
भारतीय महिला संघाची थेट एन्ट्री; अमेरिकेला अट!
India Women may have endured another heartbreaking early exit from the ICC Women’s T20 World Cup 2026, but Harmanpreet Kaur’s side still had reason to celebrate after securing qualification for the Los Angeles 2028 Olympic Games. Despite crashing out following a six-wicket defeat… pic.twitter.com/AgKmptjYeL
— IndiaToday (@IndiaToday) June 29, 2026
नुकत्याच संपलेल्या महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधील कामगिरीच्या आधारे पहिल्या ४ महिला संघांची जागा पक्की झाली आहे. वेगवेगळ्या खंडांतून सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर आशियामधून भारत, ओशिनियामधून ऑस्ट्रेलिया, युरोपमधून इंग्लंड (ग्रेट ब्रिटन) आणि आफ्रिकामधून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑलिम्पिकचे थेट तिकीट मिळवले आहे.
यजमान असल्यामुळे अमेरिका संघाला थेट प्रवेश मिळू शकतो, परंतु त्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत त्यांना आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये अव्वल १५ संघांत स्थान मिळवणे अनिवार्य आहे.
वेस्टइंडीज आणि शेवटच्या जागेचे समीकरण!
वेस्टइंडीज हा अनेक देशांचा समूह असल्याने ऑलिम्पिकमध्ये त्यांना थेट खेळता येणार नाही. जर वेस्टइंडीज संघ रँकिंगमध्ये अव्वल ८ मध्ये राहिला, तर या कॅरेबियन देशांमध्ये एक अंतर्गत स्पर्धा होईल आणि त्यातील विजेता देश पात्रता फेरीत खेळेल. पहिल्या ५ संघांची निवड रँकिंगनुसार होईल, तर सहाव्या आणि अंतिम संघासाठी २०२७ मध्ये ८ संघांची विशेष ‘आयसीसी ऑलिम्पिक क्वालिफायर’ स्पर्धा घेतली जाईल.





