Ashwin Slams Batters : ‘IPL च्या सपाट खेळपट्ट्यांची सवय नडली…’, आयर्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर अश्विनची भारतीय फलंदाजांवर टीका
Ashwin Slams Batters : धक्कादायक पराभवानंतर भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने टीम इंडियाच्या फलंदाजांवर अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

Ravichandran Ashwin Criticizes Indian Batters IND vs IRE T20I : टी-२० विश्वचषक जिंकून अवघे तीन महिनेही पूर्ण झाले नसताना भारतीय क्रिकेट संघाला आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ०-२ असा मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच आयर्लंडने भारताला ‘क्लीन स्वीप’ दिल्यामुळे संपूर्ण क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक पराभवानंतर भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (R. Ashwin ) याने टीम इंडियाच्या फलंदाजांवर अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “भारतीय फलंदाजांना आयपीएलमधील सपाट खेळपट्ट्यांची सवय लागली आहे,” अशा कडक शब्दांत अश्विनने खेळाडूंना सुनावले आहे. (Ashwin Slams Batters)
“हा पराभव धक्कादायक नाही, तर वास्तवाची जाणीव करून देणारा” (Ashwin Slams Batters)
रविचंद्रन अश्विनने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून भारतीय फलंदाजांच्या सुमार कामगिरीवर तीव्र संताप व्यक्त केला. अश्विन म्हणाला, “आयर्लंडविरुद्धचा हा पराभव माझ्यासाठी धक्कादायक नसून भारतीय संघाला वास्तवाची जाणीव करून देणारा आहे. भारतीय फलंदाज आयपीएलमधील फलंदाजांना पोषक आणि अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय लावून घेत आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा आव्हानात्मक आणि कठीण खेळपट्ट्या समोर येतात, तेव्हा त्यांना खेळताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.”
🚨 R. ASHWIN BLAMES IPL PITCHES FOR INDIA’S SHOCK DEFEAT TO IRELAND 🇮🇳
Former India spinner Ravichandran Ashwin believes India’s loss to Ireland exposed a bigger issue in Indian cricket.
🗣️ Ashwin said:
“Indian players are getting used to batting on the 24-carat flat wickets… pic.twitter.com/n8PZzfUrZK
— Infinite Infos (@infiniteInfos) June 29, 2026
तो पुढे म्हणाला, “आयपीएलमध्ये जशा फलंदाजीसाठी सोप्या खेळपट्ट्या असतात, तशा आयर्लंडमध्ये मुळीच नव्हत्या. त्यामुळे मला येथील क्रिकेटचा दर्जा खूप आवडला. भारतीय संघातील बहुतांश फलंदाज थेट आयपीएल खेळून आले आहेत, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमची खरी परीक्षा अशा खेळपट्ट्यांवर होते, जिथे चेंडूला स्विंग आणि सीम मूव्हमेंट मिळते.”
आयपीएलच्या प्रभावावर पुन्हा सुरू झाली चर्चा! (Ashwin Slams Batters)
“Not every track is an IPL wicket!” Ravichandran Ashwin on India’s shocking Ireland collapse🚨😭
Ravichandran Ashwin said 🗣️
“The kind of 24-carat batting pitches we see in the IPL weren’t available here, and I really enjoyed the quality of cricket that was played. Most of… pic.twitter.com/hhzngb72jo
— sportified (@adi25611) June 29, 2026
मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभव पत्करावा लागला होता, तर दुसऱ्या सामन्यात अवघ्या १ धावेने विजय हुकला. अश्विनच्या मते, आयपीएलमुळे भारतीय फलंदाजी कागदावर मजबूत झाली असली तरी प्रत्येक खेळपट्टी धावांचा पाऊस पाडणारी नसते. युवा फलंदाजांनी आव्हानात्मक परिस्थितीत आणि वेगवेगळ्या वातावरणात खेळण्याची सवय लावून घेतली पाहिजे, तरच ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी खऱ्या अर्थाने सक्षम बनतील. (Ashwin Slams Batters)
भारताच्या या ऐतिहासिक पराभवानंतर आता संघ निवड आणि फलंदाजीच्या पद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, १ जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेत टीम इंडिया कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ashwin Slams Batters)





