Shreyas Iyer Reaction : “प्रामाणिकपणे सांगायचे तर…”, आयर्लंडविरुद्धच्या मालिका पराभवानंतर श्रेयस अय्यरने कोणावर फोडलं खापर?
Shreyas Iyer Reaction : बेलफास्टच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दोन्ही सामने गमावल्यानंतर भारताचा नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रतिक्रिया दिली आहे.

Shreyas Iyer Reaction India Loss against Ireland 2nd T20I : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला अवघ्या १ धावेने अत्यंत चुरशीच्या पराभवाला सामोरे जावे लागले. बेलफास्टच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दोन्ही सामने गमावल्यानंतर भारताचा नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रतिक्रिया दिली आहे.
पहिल्या सामन्यात भारताचा ३४ धावांनी पराभव झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २० षटकांत ९ बाद १५३ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर श्रेयस अय्यरने फलंदाजांच्या सुमार कामगिरीवर बोट ठेवले आहे.
“आम्ही खेळपट्टीचे वर्तन समजू शकलो नाही”; श्रेयसचे स्पष्टीकरण!
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून आपली पहिलीच मालिका खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने पराभवानंतर सांगितले की, “मला असे वाटते की या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी गेल्या सामन्यापेक्षा खूप चांगली कामगिरी केली, परंतु आमची फलंदाजी पुन्हा एकदा कमालीची निराशाजनक राहिली. आम्ही खेळपट्टीचा अंदाज अचूकपणे लावू शकलो नाही. धावा करताना एकेरी धावेचे दुहेरी धावेत रूपांतर करण्यात आम्ही मागे पडलो. या बाबतीत आयर्लंडने आमच्यापेक्षा खूप सरस खेळ केला.”
🚨BIG STATEMENT OF SHREYAS IYER ON HIS CAPTAINCY 🚨
Shreyas Iyer said 🗣️:
“It’s definitely not a great start of Captaincy, honestly speaking, but kudos to them, the way they played.”
” Ireland team, I think they showed the professionalism and definitely had a tremendous idea… pic.twitter.com/xxMOj9uT3s
— Indian Cricket (@IPL2025Auction) June 28, 2026
तो पुढे म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर ही मालिका आमच्यासाठी खूप वाईट ठरली, पण आयर्लंडचे कौतुक करावे लागेल. त्यांनी उत्कृष्ट व्यावसायिकता दाखवली आणि त्यांची क्षेत्ररक्षणही अतिशय दर्जेदार होते. या ऐतिहासिक विजयासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.”
प्रिन्स आणि सूर्यांशचे कौतुक; आता लक्ष इंग्लंड दौऱ्यावर –
🚨 ANOTHER HUMILIATION FOR INDIA 🚨
– India lost a series against Ireland first time in history.👀
– Shreyas Iyer Era started with Humiliating series loss.🤡 pic.twitter.com/to9cTHYK4H— Cricket Central (@CricketCentrl) June 28, 2026
या सामन्यात भारताकडून पदार्पण करणाऱ्या प्रिन्स यादव आणि सूर्यांश शेडगे यांचे कर्णधाराने कौतुक केले. श्रेयस म्हणाला, “प्रिन्स आयपीएल २०२६ दरम्यान उत्तम फॉर्ममध्ये होता आणि त्याने तीच लय येथेही कायम ठेवली (प्रिन्सने २२ धावांत ३ विकेट्स घेतले). सूर्यांशचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता, तो यातून खूप काही शिकेल.”
भारतीय संघाचा हा दौरा संपला असून, संघ आता थेट इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. १ जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. या आगामी मालिकेत तरी १५ वर्षांचा वंडर बॉय वैभव सूर्यवंशी याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





