IND W vs SA W Final : अंपायरने दीप्ता शर्माला चुकीने आऊट देताच संतापला रोहित शर्मा, पाहा VIDEO

IND W vs SA W Final Rohit Sharma Reaction Viral : महिला वनडे विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. या सामन्यात भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी रोहित शर्मा नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर पोहोचला आहे. या सामन्यादरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो अंपायरच्या चुकीच्या निर्णयावर भडकलेला दिसत आहेत. खरे तर अंपायरने दीप्ती शर्माला चुकीने बाद ठरवले होते, ज्यामुळे रोहित शर्मा निराश झाल्याचे दिसले.
रोहित शर्माची रिअॅक्शन व्हायरल –
भारताच्या डावातील ३७ वे षटक नादिने डी क्लार्क टाकत होती. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दीप्ती शर्माने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू आणि बॅट यांच्यात संपर्क झाला नाही. चेंडू थेट तिच्या पॅडवर लागला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केली आणि अंपायरने बराच विचार करून तिला बाद घोषित केले. यानंतर दीप्ती शर्माने लगेच रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये स्पष्ट झाले की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच होत होता. दीप्तीने रिव्ह्यू घेताना स्टँडमध्ये बसलेल्या रोहित शर्माने अंपायरच्या या निर्णयावर वेगळी रिअॅक्शन दिली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
rohit sharma reaction#Rohitsharma #WomensWorldCup2025 #WomensWorldCup #indwvssaw pic.twitter.com/RcEOZuwf8b
— Hitesh Jha (@HiteshjhaL58268) November 2, 2025
सामन्याबद्दल बोलायचे तर एकेकाळी असे वाटत होते की भारतीय संघ ३५० धावसंख्येपर्यंत पोहोचेल, परंतु मधल्या फळीत घसरण आणि मंद फलंदाजीमुळे ते घडू शकले नाही. त्यामुळे भारतीय संघ फक्त ३०० धावसंख्येच्या जवळ पोहोचू शकला. महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे आणि विश्वचषक अंतिम सामन्यातील भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. २०२२ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात पाच बाद ३५६ धावा करणारा ऑस्ट्रेलिया संघ या बाबतीत अव्वल स्थानी आहे.
आता दक्षिण आफ्रिकेला एक विक्रमी धावसंख्याच पाठलाग करावा लागेल. महिला विश्वचषक अंतिम सामन्यात यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यात आलला नाही. महिला एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा सर्वोच्च पाठलाग २७५ धावांचा आहे, जो त्यांनी २०२२ मध्ये भारताविरुद्धच केला होता.





