Rohit Pawar : “सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा…” रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar : 'सत्ताधारी लोक गरीबाची थट्टा करत आहेत'

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार पेपरफुटीच्या घटनांनंतर विद्यार्थांसोबत पुण्यातील एस.एम जोशी पुलाजवळ आंदोलन करत आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी त्यांचा राजीनामा पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसह विद्यार्थी आंदोलन करत असून अनेक दिग्गज नेतेमंडळींकडून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.
आज या आंदोलनाचा अकरावा दिवस आहे. मात्र अद्यापही भीमनवार यांचा राजीनामा झाला नसल्याने रोहित पवार यांनी थेट इशारा दिला आहे. आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या विद्यार्थ्यांशी बोला, सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा उद्या विद्यार्थी वेगळा विचार करतील, असंरोहित पवारांनी म्हंटले आहे.
सरकारचा देखील राजीनामा घ्यावा लागेल
“भीमनवार मुख्यमंत्री साहेबांचे जीवलग मित्र आहेत. ते विद्यार्थ्यांऐवजी मित्राची जास्त काळजी घेत आहेत. पण आज संध्याकाळपर्यंत काहीतरी निरोप द्या विद्यार्थ्यांना भेटा, नाहीतर उद्या मात्र विद्यार्थी वेगळा निर्णय घेऊ शकतात. मग अध्यक्षांचा सोडा सरकारचा देखील राजीनामा घ्यावा लागेल,” असा अल्टिमेटम रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे.
पुढे रोहित पवार म्हणाले, “येथील विद्यार्थ्यांना अर्बन नक्षल बोलण्यात आलं. पैसे घेतले असा आरोप केला. इथे विद्यार्थी स्वतःच्या हक्कासाठी आले आहेत यांना बोलणं म्हणजे सत्ताधारी लोकांचे एवढं म्हणणं आहे की, जे गरीब लोक आहेत, त्यांना दुसरं काहीच काम नाही, मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून हिणवत आहेत. सत्ताधारी लोक गरीबाची थट्टा करत आहेत. शेतकऱ्यांच्या पोरांची मजा करत आहेत. एमपीएसीच्या अध्यक्षांना हटवा, हीच मागणी कायम आहे आणि एमपीएससीचा शुद्धीकरण झालंच पाहिजे.”
मुख्यमंत्रीसाहेब मित्राचा विचार जास्त करतायतं
पुढे रोहित पवार म्हणाले की, “भीमनवार जे आहेत एमपीएससीचे अध्यक्ष ते मुख्यमंत्री साहेबांचे जीवलग मित्र असतील, कॉलेजमध्ये त्यांनी एकत्र अभ्यास केला असेल. 6 वर्षे आरटीओ कमिशनर त्यांना कोणी केले असेल? तर ते मुख्यमंत्री साहेबांनी केले आहे. त्याच्याबरोबर आयोगाचे अध्यक्ष सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी बनवलं. मग आता मित्राबद्दल निर्णय घेताना जर विद्यार्थ्यांकडून मागणी होत असेल मित्राला हटवा दोन-तीन दिवसात हा विषय व्हायला पाहिजे होता.
पण एवढा काळ जर हा विषय खेचला जात असेल तर मुख्यमंत्रीसाहेब मित्राचा विचार जास्त करत असल्याचे दिसतं आणि सामान्य परिवारातील विद्यार्थ्यांचा करत नाही हे सिद्ध होतं,” असेही रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा:






