Navnath Ban : “अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये, तुमच्या पाठीशी रोहित पवार असतील, तर…” नवनाथ बन यांचे विवेकानंद पाटलांना प्रत्युत्तर
Navnath Ban: नवनाथ बन यांनी शेअर केला कीर्तनाचा व्हिडिओ

Navnath Ban: शरद पवार गटाचे नेते रोहित पवार MPSC विद्यार्थ्यांसोबत पेपरफुटीच्या घटनांनंतर पुण्यातील एस.एम जोशी पुलाजवळ आंदोलन करत आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी त्यांचा राजीनामा पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसह विद्यार्थी आंदोलन करत असून अनेक दिग्गज नेतेमंडळींकडून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.
या आंदोलनात आपल्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा विवेकानंद पाटील आणि भाजप नेते नवनाथ बन यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक युद्धाची देखील सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
विवेकानंद पाटील माजगावकर यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार असतील, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा आहे, हे लक्षात ठेवा.
बाकी, तुम्ही वेड्याला वेद म्हणायला लावले, या अहंकारात राहा. मी वारकऱ्याचा पोरगा आहे. अध्यात्माचं हे वेड मला आज लागलेलं नाही, तर लहानपणापासूनच आहे.
विश्वास बसत नसेल तर ३-४ वर्षांपूर्वीचा हा कीर्तनाचा व्हिडिओ कान उघडे ठेवून नीट ऐका आणि यातलं काही रोहित पवारांना कळतं का विचारा!
@RRPSpeaks— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) October 11, 2026
याचदरम्यान आता नवनाथ बन यांनी एक व्हिडीओ शेअर करत पुन्हा एकदा विवेकानंद पाटील यांच्यासह रोहित पवारांनी डिवचलं आहे. सोशल मिडीया एक्सवर स्वत: नवनाथ बन कीर्तन करत असल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. सोबतच नवनाथ बन यांनी लिहिले की, “विवेकानंद पाटील माजगावकर यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार असतील, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा आहे, हे लक्षात ठेवा.”
“बाकी, तुम्ही वेड्याला वेद म्हणायला लावले, या अहंकारात राहा. मी वारकऱ्याचा पोरगा आहे. अध्यात्माचं हे वेड मला आज लागलेलं नाही, तर लहानपणापासूनच आहे. विश्वास बसत नसेल तर ३-४ वर्षांपूर्वीचा हा कीर्तनाचा व्हिडिओ कान उघडे ठेवून नीट ऐका आणि यातलं काही रोहित पवारांना कळतं का विचारा”, असंही पुढे बन यांनी म्हटलं आहे. यावर आता रोहित पवार यांच्यासह विवेकानंद यांच्याकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहावे लागेल.
हेही वाचा :




