Rishabh Pant : भारतीय संघाला मोठा धक्का! ऋषभ पंत दुखापतीमुळे तब्बल ‘इतके’ आठवडे मैदानापासून राहणार दूर

Rishabh Pant six weeks rest : इंग्लंड आणि भारत यांच्यात ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस चांगलाच रंगला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याला भारतीय संघाला पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला. ऋषभ पंतच्या पायाला चेंडू लागल्याने गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे रिटायर हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. यावेळी त्याला नीट उभा पण राहता येत नव्हते. आता त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे, जी टीम इंडियाची चिंता वाढवणारी आहे.
ऋषभ पंत 6 आठवड्यांसाठी बाहेर –
बीसीसीआयच्या एका सूत्राने एक्सप्रेस स्पोर्ट्सला सांगितले की, ऋषभ पंतला 6 आठवड्यांसाठी क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याचा थेट अर्थ असा की, तो या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंत मदतीशिवाय चालू देखील शकत नाहीत. अहवालात म्हटले आहे, “स्कॅनच्या अहवालात फ्रॅक्चर दिसून आले आहे. त्यामुळे तो ६ आठवड्यांसाठी बाहेर झाला आहे. वैद्यकीय पथक हे पाहत आहे की, वेदनाशामक औषधांच्या (पेनकिलर) सहाय्याने तो पुन्हा फलंदाजीसाठी उतरू शकेल की नाही. सध्या त्याला चालण्यासाठी वैद्यकीय आधाराची गरज आहे आणि तो फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.”
🚨 PANT OUT FOR 6 WEEKS. 🚨
– Rishabh Pant advised a 6 week rest for a fractured toe. (Express Sports). pic.twitter.com/d3oavEU1C1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 24, 2025
इशान किशनला मिळू शकते संधी?
🚨 KISHAN IN TEST CRICKET. 🚨
– Ishan Kishan likely to be added for the 5th Test Vs England. (Devendra Pandey). pic.twitter.com/Wvc5otJpm3
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 24, 2025
ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे आता इशान किशनला कसोटी संघात स्थान मिळवण्याची शक्यता वाढली आहे. सध्या इशान नॉटिंगहॅमशायरकडून काउंटी क्रिकेट खेळत आहे आणि त्याची कामगिरी प्रभावी राहिली आहे. भारताच्या कसोटी संघात सध्या ध्रुव जुरेल हा यष्टीरक्षक म्हणून उपलब्ध आहे. मात्र, जर पंतला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेला, तर अलीकडील कामगिरी पाहता झारखंडचा इशान किशन याला ओव्हल येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी संघात स्थान मिळू शकते.
हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंडच्या चाहत्यांकडून गिलला हूटिंग, स्टोक्सने विकेट घेताच केला एकच जल्लोष, पाहा VIDEO
भारताची पहिल्या दिवशी धावसंख्या 4 बाद 264 धावा
मँचेस्टर कसोटीत पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी भारताला शानदार सुरुवात करुन दिली. साई सुदर्शनने अर्धशतक झळकावले. ऋषभ पंत 37 धावांवर चांगली फलंदाजी करत होता, परंतु तो रिटायर्ड हर्ट झाला. यानंतर पहिल्या दिवसअखेर भारताने 83 षटकांत 4 बाद 264 धावा केल्या. सध्या रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर, दोघेही प्रत्येकी 19 धावांवर फलंदाजी करत आहेत.





