IND vs ENG : ऋषभ पंतच्या Run Out ने भारताला मोठा धक्का, केएल राहुलच्या चुकीमुळे गमावली मोठी विकेट!

IND vs ENG Rishabh Pant Runout Video Viral : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी लॉर्ड्सच्या मैदानावर टीम इंडियाला एक चूक चांगलीच महागात पडली. ज्यामुळे ऋषभ पंतला शानदार फलंदाजी करत असताना लंचच्या अगोदर धावबाद व्हावे लागले. केएल राहुलच्या चुकीच्या निर्णयामुळे ही घटना घडली. बेन स्टोक्सने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत चेंडू थेट यष्ट्यांवर मारला आणि पंतला बाद केले. यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला. अशा प्रकारे ऋषभ पंत ७४ धावांवर धावबाद झाला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
केएल राहुलची चूक पडली महागात –
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत शानदार फॉर्ममध्ये होता आणि त्याने ७४ धावा केल्या होत्या. लंचच्या अगोदर शोएब बशीरने ऑफ-साइडला एक चेंडू टाकला. पंतने तो हलकेच खेळला. केएल राहुलला वाटले की एक धाव सहज मिळू शकेल, त्याने पंतला धावण्यास सांगितले. पण पंतला प्रतिसाद देण्यास थोडा उशीर झाला. तो काही समजण्याआधीच बेन स्टोक्सने झटपट चेंडू उचलला आणि एका झटक्यात यष्ट्यांवर मारला. पंत क्रीझपासून खूप दूर होता आणि त्याला बाद घोषित करण्यात आले. यामुळे इंग्लंडला एक महत्त्वाची विकेट्स मिळाली.
ऋषभ पंत धावबाद झाल्याचा व्हिडीओ –
RUN OUT! 🙌
Ben Stokes aims and fires at the stumps and Rishabh Pant is out! ❌ pic.twitter.com/Z9JWwV9aS4
— England Cricket (@englandcricket) July 12, 2025
ऋषभ पंतचं आउट होणं हा भारतासाठी मोठा धक्का होता. यानंतर अनेकांनी केएल राहुलवर टीका केली. ऋषभ पंत चांगली फलंदाजी करत होता आणि तो भारतासाठी आणखी धावा बनवू शकला असता. लंचपर्यंत भारताने ४ गडी गमावून २४८ धावा केल्या होत्या. त्यावेळी केएल राहुल ९८ धावांवर नाबाद होता. यानंतर केएल राहुलही शतक झळकावून बाद झाला. त्यामुळे भारताला पाचवा धक्का बसला.
हेही वाचा – IND vs ENG : लॉर्ड्सवर केएल राहुलचे पुन्हा एकदा वर्चस्व! जबरदस्त शतक ठोकत नोंदवला खास विक्रम
केएल राहुलने लॉर्ड्सवर दुसऱ्यांदा शतक ठोकले आहे. यापूर्वी २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने शतक झळकावले होते. हे त्याच्या कारकिर्दीतील १० वे शतक आहे. त्याने १७६ चेंडूत हे शतक पूर्ण केले. या शतकी खेळीत त्याने एकूण १३ चौकार मारले. या मालिकेतील त्याचे दुसरे शतक आहे. यापूर्वी लीड्स येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात राहुलने शानदार शतक ठोकले होते. तिथे त्याने दुसऱ्या डावात २४७ चेंडूंमध्ये १३७ धावांची खेळी केली होती.
हेही वाचा – IND vs ENG : ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्ध रचला इतिहास! व्हिव्हियन रिचर्ड्सचा विक्रम मोडत ठरला नवा ‘सिक्सर किंग’
जडेजा-नितीशने सावरला भारताचा डाव –
केएल राहुल आणि ऋषभ पंत बाद झाल्यानंतर जडेजाने नितीश रेड्डीच्या साथीने डाव सांभाळला. जडेजा उत्कृष्ट फलंदाजी करत आहे, ज्यामुळे भारताने पहिल्या डावात ३०० धावांचा पल्ला पार केला आहे. वृत्तलिहिपर्यंत ९३ षटकानंतर भारताची धावसंख्या ५ बाद ३२२ धावा आहे. त्यामुळे भारतीय संघसध्या इंग्लंडपेक्षा ६५ धावांनी मागे आहे. रवींद्र जडेजा ४० आणि नितीश रेड्डी ३० धावांवर खेळत आहे.





