IND vs ENG : केएल राहुलचा इंग्लंडमध्ये खास पराक्रम, सचिन-विराटच्या यादीत मिळवलं स्थान

IND vs ENG KL Rahul Joins Elite List of Indian Batsmen : मँचेस्टर येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज के.एल. राहुलने या सामन्यात 11 धावा करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने इंग्लंडमध्ये 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या असून तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. यासह तो सचिन-विराट यांसारख्या दिग्गजांच्या खास यादीत सामील झाला आहे.
केएल राहुलच्या इंग्लंडमध्ये 1000 कसोटी धावा पूर्ण –
इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर सचिन तेंडुलकर हा यादीत अव्वल स्थानावर आहेत. तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत इंग्लंडमध्ये 17 सामन्यांत 54.31 च्या सरासरीने 1575 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविडचे नाव आहे. द्रविडने इंग्लंडमध्ये 13 सामन्यांत 68.80 च्या सरासरीने 1376 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर आहेत. त्यांनी इंग्लंडमध्ये 16 कसोटी सामन्यांत 1152 धावा केल्या आहेत.
Milestone Unlocked 🔓
KL Rahul completes 1⃣0⃣0⃣0⃣ runs in Test Matches in England 👏👏#TeamIndia 31/0 after 11 overs
Updates ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#ENGvIND | @klrahul pic.twitter.com/1kalFjpZDc
— BCCI (@BCCI) July 23, 2025
माजी भारतीय कर्णधार विराट कोहली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने इंग्लंडमध्ये 17 सामन्यांत 33.21 च्या सरासरीने 1096 धावा केल्या आहेत. दरम्यान, मँचेस्टर येथील कसोटी सामन्यात 11 धावा करत केएल राहुलने इंग्लंडमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने आतापर्यंत इंग्लंडमध्ये 13 सामन्यांत 1008* धावा केल्या आहेत. या सामन्यात त्याला आपल्या धावसंख्येत आणखी वाढ करण्याची संधी आहे. तसेच, त्याच्याकडे विराट कोहलीला मागे टाकून या यादीत पुढे जाण्याची संधी आहे.
हेही वाचा – Anshul Kamboj : रणजीत १० विकेट्स ते कसोटी पदार्पणवीर: कोण आहे अंशुल कंबोज? जाणून घ्या
इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारे भारतीय खेळाडू:
1. सचिन तेंडुलकर: 1575 धावा
2. राहुल द्रविड: 1376 धावा
3. सुनील गावस्कर: 1152 धावा
4. विराट कोहली: 1096 धावा
5. केएल राहुल: 1008* धावा





