IND vs ENG : इंग्लंडच्या चाहत्यांकडून गिलला हूटिंग, स्टोक्सने विकेट घेताच केला एकच जल्लोष, पाहा VIDEO

गिलला इंग्लंडच्या चाहत्यांनी चिथावले –
मँचेस्टर येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधाराला प्रेक्षकांनी खूप टोमणे मारले. लॉर्ड्स येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान झॅ क्रॉलीशी झालेल्या वादानंतर आणि सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत गिल यांनी दिलेल्या तिखट वक्तव्यमुळे हे घडले. भारतीय संघाने फलंदाजीला सुरुवात चांगली केली होती. परंतु दुसऱ्या सत्रात इंग्लंडने जोरदार पुनरागमन केले.शुबमन गिल जेव्हा फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला खूप चिथावले. तरीही, गिलने उत्कृष्ट फटके खेळून प्रेक्षकांना शांत केले.
PR made prince scores without flat tracks – 15, 6, and 12 😭
REPEAT AFTER ME – SHUBMAN GILL IS FRAUD.
pic.twitter.com/3SJYKe5ILX— 𝐉𝐨𝐝 𝐈𝐧𝐬𝐚𝐧𝐞 (@jod_insane) July 23, 2025
मात्र, त्याची खेळी फार काळ टिकली नाही. बेन स्टोक्सने त्याना बाद करून इंग्लंडच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. चौथ्या कसोटीपूर्वी गिलने इंग्लंडच्या खेळाडूंवर खेळ भावनेचा भंग केल्याचा आरोप केला होता.मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर बुधवारी प्रेक्षकांनी शुभमन गिलला चांगले ट्रोल केले. जेव्हा गिल फलंदाजीला उतरला, तेव्हा त्याला तीव्र हूटिंगचा सामना करावा लागला. भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना संयमित सुरुवात केली.
हेही वाचा – IND vs ENG : चार वर्षात १५ खेळाडूंच पदार्पण! मग फक्त ‘या’ खेळाडूवरच इतका अन्याय का?
सलामीच्या जोडीने साकारली ९४ धावांची भागीदारी –
सलामीच्या जोडीने ९४ धावांची भागीदारी केली. परंतु, इंग्लंडने पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात जोरदार पुनरागमन केले. त्यांनी दोन्ही सलामीवीरांना झटपट बाद केले. यानंतर गिल ड्रेसिंग रूममधून बाहेर येताच मैदानात खूप गोंधळ उडाला. इंग्लंडच्या खेळाडूंवरील त्याच्या कमेंट्सबद्दल प्रेक्षकांनी त्याला खूप चिथावले. पण, भारतीय कर्णधाराने उत्तम उत्तर दिले. येताच त्याने दोन उत्कृष्ट फटके मारले आणि प्रेक्षकांना काही काळ शांत केले.
हेही वाचा – IND vs ENG : भारतीय क्रिकेटमध्ये कधीही न घडलेलं ‘ते’ ९३ वर्षांनी मँचेस्टरमध्ये घडलं, नक्की काय झालं?
गिलची खेळी फार काळ टिकली नाही –
यातून हेही समजलं की, गिलने मैदानावर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंच्या मानसिक खेळाला सामोरे जाणं शिकून घेतलं आहे. पूर्वी अशाच मानसिक खेळामुळे तो अस्वस्थ व्हायचा. पण गिलची खेळी जास्त वेळ टिकली नाही. बेन स्टोक्सने त्याला अप्रतिम चेंडूवर बाद केलं. चेंडू आतल्या बाजूने आला आणि गिलच्या पॅडवर आदळला. गिलने रिव्ह्यू घेतला, पण चेंडू थेट ऑफ स्टम्पवर आदळत असल्याचं दिसलं. यानंतर स्टोक्सने आक्रमकपणे जल्लोष केला. हा इंग्लंडकडून एक जोरदार प्रत्युत्तर होता.





