Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा..! वाढीव पाणीकपातीला तूर्तास ब्रेक; महापौरांचे प्रशासनाला आदेश
Pune News : शहराच्या पाणीपुरवठ्यात तूर्तास कोणतीही वाढीव पाणीकपात केली जाणार नाही. कालवा समितीची बैठक होईपर्यंत आहे तीच पाणीकपात कायम ठेवण्याचे आदेश महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Pune News : शहराच्या पाणीपुरवठ्यात तूर्तास कोणतीही वाढीव पाणीकपात केली जाणार नाही. कालवा समितीची बैठक होईपर्यंत आहे तीच पाणीकपात कायम ठेवण्याचे आदेश महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे पुणेकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. (Pune News)
पाटबंधारे विभागाने शहरात २० टक्के पाणीकपात करण्याची मागणी केल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यासाठी महापौरांनी बुधवारी (दि. २८) बोलावलेली बैठक बोलाविली होती. ही बैठकही आता पुढे ढकलण्यात आली आहे. (Pune News)
महापालिकेने शहराच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाकडे पाण्याचे २०२६-२७ या जलवर्षाचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात, शहरासाठी २१ टीएमसी पाण्याची मागणी केली. (Pune News)
मात्र, शहरात सध्या १० टक्के पाणीकपात लागू असतानाही पाटबंधारे विभागाने पुण्यासाठी केवळ ११.३३ टीएमसी पाणीकोटा मंजूर केला आहे. तर, या उलट मागील वर्षी १६ टीएमसी पाणी दिले होते. तेवढेही मंजूर करण्यात आलेले नाही. उलट गतवर्षाच्या तुलनेत त्यामुळे मंजूर कोट्यात सुमारे पाच टीएमसी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. (Pune News)
एकीकडे राज्य शासनाने धरणांतील पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवला असून, धरणांत सध्या खडकवासला धरण साखळीत २४ टीएमसी पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीर शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत कोणताही घाईघाईने निर्णय न घेता कालवा समितीच्या बैठकीत चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्याची भूमिका महापौरांनी घेतली आहे. (Pune News)
पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी (दि. २८) बोलावलेली बैठकही रद्द करण्यात आली आहे. आता कालवा समितीच्या बैठकीनंतरच ही बैठक घेण्यात येणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. त्यामुळे तोपर्यंत शहरात सध्या लागू असलेली एक दिवसाचीच पाणीकपात कायम राहणार असून, त्यात कोणतीही वाढ केली जाणार नाही. (Pune News)




