Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पाणीपुरवठा विभागाच्या दुरुस्तीमुळे उद्या 5 तास पाणीबंदी
Pune News : पर्वती येथील नवीन ५०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रातील तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे बुधवार, ५ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत (५ तास) शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

Pune News : पर्वती येथील नवीन ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील एस.एन.डी.डी. (एमएलआर) झोनच्या डिलिव्हरी साईड स्ल्युस व्हॉल्वच्या तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे बुधवार (दि. ५) रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ या कालावधीत शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Pune News)
तसेच गुरुवार (दि. ६) रोजी सकाळी या भागांमध्ये उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. (Pune News)
पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील एस.एन.डी.डी. (एमएलआर) झोनच्या डिलिव्हरी साईड स्ल्युस व्हॉल्वची तातडीची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी संबंधित झोनच्या पंपिंगवर अवलंबून असलेल्या भागांचा पाणीपुरवठा पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे. (Pune News)
याचा परिणाम लॉ कॉलेज रस्ता, पौड रस्ता, शीला विहार कॉलनी, वेदांतनगरी, करिष्मा सोसायटी परिसर, मयूर कॉलनी, कर्वे रस्ता, एरंडवणे, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत, भरतनगर, भरतकुंज, नवसह्याद्री सोसायटी, तसेच औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, खडकी, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, सिंध सोसायटी आणि औंधगाव परिसरातील नागरिकांवर होणार आहे. (Pune News)
गुरुवारी सकाळी संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठा उशीरा आणि कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी आवाहन केले आहे. (Pune News)
Pune District : वकील मारहाण प्रकरण भोवले; लोणीकंद पोलीस ठाण्याचा पोलीस निलंबित





