Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: गुरुवारी शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
Pune News : पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे विद्युत, पंपिंग आणि स्थापत्यविषयक तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

Pune News : पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विद्युत, पंपिंग तसेच स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने गुरुवारी (दि. २७) शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Pune News)
बुधवार मध्यरात्री १२ वाजल्यापासून गुरुवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संबंधित जलकेंद्र व टाक्यांच्या कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि. २८) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे. (Pune News)
पर्वती HLR टाकीच्या कार्यक्षेत्रातील सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, इंदिरानगर, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर आदी भागांचा पाणीपुरवठा बंद राहील. भामा आसखेडच्या कार्यक्षेत्रातील लोहगाव, कळस-धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, येरवडा आणि खराडी परिसर प्रभावित होणार आहे. (Pune News)
एसएनडीटी (HLR), चांदणी चौक व गांधी भवन टाकी परिसरातून होणारा पाणीपुरवठाही बंद राहणार असून औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, बाणेर, पाषाण, सुस, कोथरूड, वारजे, कर्वेनगर आदी भागांना त्याचा फटका बसणार आहे. पॅनकार्ड क्लब GSRमुळे बाणेर-बालेवाडी, तर वारजे जलकेंद्रामुळे कर्वेनगर परिसर प्रभावित होईल. (Pune News)
चतुःशृंगी, जुने-नवे होळकर, कोंढवे-धावडे जलकेंद्र तसेच राजीव गांधी पंपिंगच्या कार्यक्षेत्रातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. (Pune News)
Pune News : सोशल मीडियावरील बदनामीप्रकरणी रुपाली चाकणकरांची तक्रार; १७ जणांची नावे जबाबात





