RTO Pune News: प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या वाहन चाचणी परीक्षा कोट्यामध्ये मोठी वाढ करण्यात आली असून शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी सुद्धा वाहन चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पुणेकर वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार पुणे शहरातील वाहन चाचणीचा कोटा पूर्वी २५९ इतका होता. या संदर्भात अर्चना गायकवाड (प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे), स्वप्निल भोसले (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे) व राहुल जगदाळे (सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी हा कोटा २५९ वरून थेट ६०० पर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांनंतर एस.टी. महामंडळ ट्रॅकवर माननीय परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांची मान्यता मिळाल्यानंतर पुढील आठवड्यात आणखी ३०० कोटा वाढविण्यात येणार असून त्या परीक्षा एस.टी. महामंडळ ट्रॅक, भोसरी येथे घेण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास दररोज १०८८ पर्यंत कोटा वाढविण्याची तयारी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दर्शविली आहे. Srilila video : पापाराझींच्या कॅमेऱ्यात ‘तो’ क्षण झाला कैद! प्रसिद्ध अभिनेत्री चर्चेत; पुष्पा २ मध्ये केलंय काम, व्हिडीओ पाहा… तसेच त्यांच्या प्रयत्नांतून आयडीटीआर, पुणे येथे दररोज ५४४ वाहन चाचणी परीक्षांचा कोटा निश्चित करण्यात आला असून शनिवार व रविवारही परीक्षा घेतल्या जात आहेत. एस.टी. महामंडळ, भोसरी ट्रॅक कार्यान्वित झाल्यानंतर पुणे शहरातील वाहन चालकांना दररोज १०८८ ‘स’ वर्गासाठी पूर्वनियोजित वेळ देणे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे वाहन चाचणी अपॉइंटमेंटचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून पुणेकर वाहन चालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्चना गायकवाड यांच्या आदेशानुसार निर्णयांची अंमलबजावणी झाली असून अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेनुसार वाहन चाचणी परीक्षेच्या जागांमध्ये वाढ होणार आहे. हेही वाचा: Nikki And Arbaaz : ‘आमचे धर्म वेगळे, वडिलांचा विरोध…’; अरबाजने प्रपोज करताच निक्कीला अश्रु अनावर